SRH vs GT : हैदराबादला नमवत गुजरातची प्लेऑफमध्ये धडक, ३४ धावांनी मिळवला विजय

SRH vs GT
SRH vs GT
Published on
Updated on

 पुढारी ऑनलाईन डेस्क : शुभमन गिलची शतकी खेळी आणि मोहम्मद शमी, मोहित शर्माने प्रत्येकी पटकावलेल्या ४ विकेट्सच्या जोरावर गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादवर दिमाखदार विजय मिळवला. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. गुजरातने हैदराबादला नमवत आपले प्लेऑफमधील स्थान पक्के केले आहे. प्लेऑफमध्ये स्थान पक्के करणारा गुजरात पहिला संघ ठरला आहे.(SRH vs GT)

सुरुवातीला सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गुजरातला फलंदाजीचे आमंत्रण दिले. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या गुजरातने गुजरातने शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर १८८ धावा केल्या असून  हैदराबाद समोर १८९ धावांचे आव्हान ठेवले. (SRH vs GT)

गुजरातच्या १८९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला १५४ धावाच करता आल्या आणि ३४ धावांनी पराभव पत्करावा लागला. हैदराबादकडून हेन्री क्लासीनने ४४ चेंडूमध्ये ६४ धावांची अर्धशतकी खेळी करत एकाकी झुंज दिली. क्लासीन शिवाय भुवनेश्वर कुमारने २६ चेंडूमध्ये २७ धावांचे योगदान दिले. गुजरात टायटन्सकडून मोहम्मद शमी आणि मोहित शर्माने प्रत्येकी ४ तर यश दयालने १ विकेट पटकावली. (SRH vs GT)

तत्पूर्वी, गुजरातकडून शुभमन गिलने ५८ चेंडूमध्ये १०१, साई सुदर्शन ३६ चेंडूमध्ये ४७ धावा, हार्दिक पंड्या ६ चेंडूमध्ये ८ धावा, आणि डेव्हिड मिलरने ५ चेंडूमध्ये ७ धावांचे योगदान दिले आहे. तर सनरायझर्स हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने ५ तर मार्को जेन्सन, फारुकी आणि टी नटराजनने प्रत्येकी १ विकेट पटकावल्या. (SRH vs GT)

गुजरातचा संघ – शुभमन गिल, वृद्धीमान साह (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, दासुन शनका, राहुल तेवतिया, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद (SRH vs GT)

हैदराबादचा संघ – अभिषेक शर्मा, राहुल तेवतिया, अॅडन मार्करम, हन्री क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, सनवीर सिंग, मयांक मार्कंडे, मार्को जेन्सन, भुवनेश्वर कुमार, फझलहक फारुकी, टी नटराजन (SRH vs GT)

हेही वाचंलत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news