Green peas : हिरवे वाटाणे लाभदायक; वजन कमी होण्यासह कोलेस्टेरॉलच्या पातळीतही हाेते सुधारणा

हिरवे वाटाणे
हिरवे वाटाणे

नवी दिल्ली : हिवाळा आला की बाजारात गाजर, हरभरे यांच्याबरोबर हिरव्या वाटाण्याच्या शेंगाही दिसू लागतात. हे हिरवे वाटाणे चवीला अतिशय रूचकर असतात. ते तसेच खाता येतात किंवा वेगवेगळ्या भाजीतही वापरता येतात. त्याचे 'कॉम्बिनेशन' प्रत्येक भाजीला योग्य बसते! मात्र हे वाटाणे केवळ स्वादासाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही लाभदायक असतात, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

वाटाण्याच्या शेंगांमध्ये लोह, मॅगनिज आणि तांबेदेखील जास्त प्रमाणात असतात जे शरीराला अनेक रोगांपासून वाचविण्यास मदत करतात. हिरवे वाटाणे खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलच्या पातळीत बरीच सुधारणा दिसून आली आहे. वाटाण्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे शरीराची हाडे मजबूत होतात.

वाटाण्यामध्ये प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात जे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. शिवाय, वाटाण्यात कॅलरी आणि फॅटही कमी असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. नाश्त्यात वाटाणे घेतल्यास शरीरास ऊर्जा मिळते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news