Google Doodle today: भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त Google ने बनवले खास डूडल

Google Doodle today: भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त Google ने बनवले खास डूडल

पुढारी ऑनलाईन: देशभरात आज भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. या खास दिनी गुगल ने खास डुडल बनवत हा दिवस साजरा केला आहे. या डुडल कलाकृतीच्या माध्यमातून विविधतेत एकतेचा संदेश गुगलने भारतीयांना दिला आहे. गुगलने स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय हस्तकलेच्या परंपरांचे चित्रण केले आहे. हे गुगल डूडल दिल्लीस्थित कलाकार नम्रता कुमार यांनी डिझाइन (Google Doodle today) केले आहे, असे 'NDTV' ने दिलेल्या वृत्तात दिली आहे.

भारतातील वस्त्रकलेचा इतिहास खूप जुना आहे. गुगलने या विशेष डूडलमध्ये भारतीय कापडाच्या कलेचे वर्णन केले आहे. या डूडलद्वारे, Google ने भारताच्या विविध भागांतून आलेल्या विविध वस्त्र कला प्रकारांचा सन्मान करून औपचारिकतेत एकता दाखवली (Google Doodle today)आहे.

Google Doodle today: डुडलमध्ये विविध राज्यांतील हस्तकलेचा समावेश

गुगलच्या या डूडलमध्ये गुजरात कच्छचे खास नक्षीकाम दाखवण्यात आली आहे. तसेच चित्रात हिमाचल प्रदेशचे पट्टू विणकाम, पश्चिम बंगालची कांथा आणि जामदानी विणकाम, गोव्याचे कुणबी विणकाम वस्त्र, ओडिशाचे फाइन इकत, जम्मू-काश्मीरचे पश्मिना कानी वस्त्र, उत्तर प्रदेशचे बनारसी डिझाइन, महाराष्ट्राचे पैठिणी डिझाइन प्रसिद्ध आहेत. विविध राज्यांचे डिझाईन आणि वस्त्रकला डुडलमध्ये यामध्ये करण्यात आले आहे.

Google ने आजच्या डूडलमध्ये वापरलेले भारतील विविध राज्यांतील कापड कलाकृती

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news