पुढारी ऑनलाईन: ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ II यांच्या मृत्यूनंतर Google नेही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. Google ने आपल्या लोगोचा रंग बदलत म्हणजेच तो ग्रे (राखाडी) रंगात बदलून महाराणीला श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या जाण्याने ब्रिटीश इतिहासातील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या राणीच्या निधनाने जगभरातून शोक व्यक्त होत आहे. Google नेही राणी एलिझाबेथ II यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्याचे ठरवत आपल्या लोगो मध्ये बदल केला आहे.
Google आणि Alphabet कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही आपल्या ट्विटरवरून महाराणी एलिझाबेथ II यांना श्रद्धांजली वाहिली होती. पिचाई यांनी केलेलल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, महाराणी एलिझाबेथ II च्या निधनानंतर संपूर्ण यूके आणि जगभरातील लोकांकडून दु:ख व्यक्त केले जात आहे. तिच्या आयुष्यात तिचं खंबीर नेतृत्व आणि जनसेवा याचे स्थान म्हत्वाचे आहे. त्यामुळे महाराणी एलिझाबेथ II यांची आठवण कायम राहिल असेही त्यांनी म्हटले आहे.
Apple त्याच्या iPhone 14 मालिकेचे लॉन्चिंग आणि नंतर प्रमोशनमध्ये खूप व्यस्त होते. परंतु असे असूनही, कंपनीने आपल्या वेबसाइटच्या मुख्यपृष्ठाद्वारे राणी एलिझाबेथ द्वितीय यांना श्रद्धांजली वाहिली.