Google ने त्यांच्या AI चॅटबॉटचं नाव बदललं; ‘Bard AI’ ऐवजी आता ‘Gemini AI’

Google AI
Google AI

पुढारी ऑनलाईन डेस्क : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) शर्यतीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी, सर्वच टेक कंपन्या धडपडत आहेत. सर्च इंजिन कंपनी गुगल बऱ्याच काळापासून कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम करत आहे. दरम्यान, गुगलने त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता संदर्भात काहीसे मह्त्त्वपूर्ण बदल केले आहेत. यामध्ये Google ने त्यांच्या Bard AI या चॅटबॉटचे नाव बदलून Gemini AI केले आहे. (Google AI)

कंपनीने Gemini Advanced, Gemini AI ची प्रगत आवृत्ती आणली आहे, जी कंपनीच्या नवीन Ultra 1.0 LLM वर आधारित आहे. गुगलने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपले जेमिनी एआय मॉडेल सादर केले होते आणि त्यांच्या तीन आवृत्त्या नॅनो, प्रो आणि अल्ट्रा लाँच केल्या होत्या. यानंतर शक्तिशाली अल्ट्रा मॉडेल कंपनीने बंद केले. Google Gemini सह, Open AI च्या ChatGPT चॅटबॉटशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहे. जेमिनीने PaLM 2 LLM ची जागा आता प्रगत AI मॉडेलने घेतली आहे. (Google AI)

Google AI : Bard रीब्रँडिंग आणि ॲप लाँच

गुगल बऱ्याच काळापासून बार्डचे रीब्रँड करण्याची योजना करत होते. डेव्हलपर डायलन रसेलने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर या बदलाशी संबंधित माहिती शेअर केली होती. कंपनीने अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीवर नवीन जेमिनी ॲप आणले आहे. युजर्सने हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर गुगल असिस्टंटला Gemini मध्येही बदलता येईल, असे कंपनीने म्हटले आहे.

असा करता येईल प्रवेश

Gemnini ॲप डाऊनलोड केल्यानंतर, यूजर्संना Google असिस्टंट सध्या ज्या प्रकारे ऍक्सेस करता येतो त्याच पद्धतीने ते ऍक्सेस करण्याचा पर्याय मिळेल. यूजर्स पॉवर बटण दाबून, कोपऱ्यातून स्वाइप करून आणि 'Hey Google' म्हणत प्रवेश करू शकतील, असे देखील Google ने स्पष्ट केले आहे.

कंपनीकडून Gemini Advanced देखील सादर

जेमिनी व्यतिरिक्त, कंपनीने जेमिनी ॲडव्हान्स्डदेखील आणले आहे. सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितले आहे की, हा सशुल्क अनुभव असेल. या मॉडेलसह, कोडिंग आणि क्रिएटिव्हिटीपासून आदेश देणे आणि तार्किक तर्कापर्यंतची कार्ये उपलब्ध असतील. ज्या यूजर्संनी Google One AI चा प्रीमियम प्लॅन घेतला आहे ते कोणत्याही अतिरिक्त पेमेंटशिवाय दोन महिन्यांसाठी Gemini Advanced वापरण्यास सक्षम असतील. प्रीमियम AI प्लॅन Google One सेवेवर आधारित आहे आणि त्याचा विनामूल्य चाचणी कालावधी संपल्यानंतर, वापरकर्त्यांना दरमहा 1,950 रुपये द्यावे लागतील, असही कंपनीच्या सीईओनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news