वेध शेअर बाजाराचा | जीडीपीची कमाल, बाजारात धमाल

वेध शेअर बाजाराचा | जीडीपीची कमाल, बाजारात धमाल
Published on
Updated on

गुरुवारी सायंकाळी जीडीपी वाढीची शुभवार्ता आली आणि शुक्रवारी बाजारात दिवसभर तेजीची उधळण झाली. शनिवारीही काही तांत्रिक कारणास्तव दोन तास बाजार चालू होते. त्यामध्येही तेजी दिसून आली. सेन्सेक्सने काही क्षण 74 हजारांची पातळी दर्शवली. निफ्टीने 22378.40 हा नवीन उच्चांक प्रस्थापित केला, तर बँक निफ्टी 47000 या महत्त्वाच्या स्तरावरती (47297.50) बंद झाला. सेन्सेक्सला आता पाऊण लाखाचे वेध लागले आहेत. (73806.15).

या वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीमध्ये भारताची जीडीपी वाढ 7.6 टक्के होती. मात्र, कमी झालेला सरकारी खर्च, औद्योगिक उत्पादनातील घसरण आणि अनियमित मान्सून यापुढे जीडीपी वाढ तिसर्‍या तिमाहीमध्ये 6.64 टक्के राहील, असा अंदाज होता. मात्र, 8.4 टक्क्यांनी वाढून जीडीपीने बाजाराचा सुखद धक्का दिला. Manufacturing आणि Construction सेक्टर्सनी चांगली वाढ दर्शवली. ती सेक्टर्स अनुक्रमे 11.6 आणि 9.5 टक्क्यांनी वाढली. Private Consumption नेसुद्धा वाढ नोंदवलेली आहे. मात्र Agriculture, Government, Expenditure, Import Export यामध्ये घट दिसून आली आहे.

पतंजली फूडस (रु. 1567.05) हा शेअर सप्ताहात सात टक्क्यांनी घसरला. पतंजलीची जी पारंपरिक औषधे आहेत त्यांनी रोग बरे होतात, अशा जाहिराती बंद कराव्यात, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यामुळे ही घसरण झाली. मात्र, पतंजलीचे म्हणणे असे की, बाजारामध्ये पतंजली फूडस ही कंपनी नोंदणीकृत आहे आणि तिच्यामध्ये पतंजलीची औषधे समाविष्ट नाहीत.

भारतीय शेअर बाजारामध्ये निर्देशांक, पुनर्बांधणीचे (Inded Rebalancing) चे काम सेबीकडून नियमितपणे होत असते. याचा अर्थ विविध मुख्य (उदा. निफ्टी 50, सेन्सेक्स) आणि क्षेत्रीय किंवा Sectoral (उदा. निफ्टी बँक, निफ्टी आयटी वगैरे) निर्देशांकामध्ये समाविष्ट असणार्‍या कंपन्यांचे शेअर बाजारातील कामगिरीवर आधारित मूल्यमापन होत असते. निर्देशांक समतोल आणि सर्वसमावेशक राहावेत, उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या कंपन्यांचा निर्देशांकात समावेश व्हावा, निर्देशांक रचनेमध्ये पारदर्शकता राहावी हे हेतू यामागे असतात. गुंतवणूकदारांच्या द़ृष्टिकोनातून तर या Index Rebalancing चे महत्त्व खूप असते. कारण चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्यांना चांगली आणि अद्ययावत माहिती मिळते. या Index rebalancing मध्ये ज्या कंपन्यांची इंडेक्समधून गच्छंती होते किंवा ज्यांचा इंडेक्समध्ये नव्याने समावेश होतो, त्यांच्या बाजारातील ते lumes आणि शेअर्सच्या किमतीवर प्रचंड परिणाम होतो. कारण Foreign Fortfolio Management कंपन्या इंडेक्समधील कंपन्यांना प्राधान्य देतात.

हे सर्व आता लिहिण्याचे कारण म्हणजे गेल्याच महिन्यात काही निर्देशांकांची पुनर्बांधणी होऊन काही कंपन्या त्या त्या निर्देशांकामधून वगळण्यात आल्या, तर काही कंपन्यांचा नव्याने समावेश झाला. हे बदल खालीलप्रमाणे –

निफ्टी 50 मधून UPL ला वगळण्यात आले आणि तिच्या जागी श्रीराम फायनान्सचा समावेश करण्यात आला.

निफ्टी नेक्स्ट 50 या महत्त्वाच्या इंडेक्समधून अदान विल्मर, मुथूट फायनान्स, पीआय इंडस्ट्रीस, प्रॉक्टर अँड गँबल हायजीन या कंपन्यांची उचलबांगडी झाली. त्यांची जागा अदानी पॉवर, आयआरएफसी, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस, पॉवर फायनान्स कार्पोरेशन आणि आरईसी या कंपन्या घेतील.

याचप्रमाणे निफ्टी 500 आणि Niftty Midcap Select या निर्देशांकांचेसुद्धा Rebalancing झाले आहे. परंतु, त्यामधील कंपन्यांची यादी मोठी असल्याने जागेअभावी इथे देता येत नाही.

शेअर बाजारामध्ये Consumer Food कंपन्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. लाट कोणतीही असो; तेजीची वा मंदीची, Consumer Foods कंपन्या त्यांच्या दर्जाप्रमाणे बाजारात तेजी दर्शवत असतात. Nestle, Britannia, Varun Beverages, Marico, KRBL या कंपन्यांचा भारतीय बाजारातील बोलबाला आपल्याला माहीतच आहे. ITC ही कंपनी सेन्सेक्स आणि निफ्टीच्या कामगिरीवर किती प्रभाव टाकते, हेही आपण पाहतो. Tata Consumer रोज नवनवीन उच्चांक प्रस्थापित करीत आहे, हेही आपण पाहतो. परंतु, आपल्याला हे कदाचित माहीत नसेल की, Consumer Foods क्षेत्रातील 109 कंपन्या भारतीय बाजारामध्ये सूचिबद्ध आहेत.

इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज ही अशीच एक या क्षेत्रातील कंपनी आहे. तिच्या उत्पादनांची श्रेणी अतिशय व्यापक आहे. विशेषतः Dairy Products आणि Processed Foods मध्ये तिची उत्पादने आहेत. जागेअभावी या कंपनीची अधिक माहिती इथे देता येत नाही. फक्त इतकेच सांगता येईल की, मागील एका वर्षात या शेअरने 1355 टक्के परतावा दिला आहे. एक वर्षापूर्वी 32 रु. असणारा हा शेअर आज 600 रुपयांच्या पुढे गेला आहे. ITC महिनोन महिने आहे तिथे स्थिर राहिला तरी त्यावर किती चर्चा होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news