Gold Silver Price Today | सोने दराने गाठला विक्रमी उच्चांक! चांदीही महागली, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today
Gold Price Today

पुढारी ऑनलाईन : सराफा बाजारात सोने दराने उच्चांक गाठला आहे. आज मंगळवारी (दि.५) शुद्ध सोने म्हणजेच २४ कॅरेट सोन्याचा दर ९२४ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ६४,४०४ रुपयांवर खुला झाला. तर काल शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६३,४८० रुपयांवर बंद झाला होता. सोन्याप्रमाणेच चांदीही महागली आहे. चांदीचा दर १,२६१ रुपयांनी वाढला आहे. चांदीचा दर प्रति किलो ७०,७७७ रुपयांवरून ७२,०३८ रुपयांवर गेला आहे. (Gold Silver Price Today)

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६४,४०४ रुपये, २२ कॅरेट ५८,९९४ रुपये, १८ कॅरेट ४८,३०३ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ३७,६७६ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ७२,०३८ रुपयांवर गेला आहे.

याआधी सोने ४ डिसेंबर रोजी प्रति १० ग्रॅम ६३,८०५ रुपयांवर गेले होते. आज सोने दराने ६४,४०० रुपयांवर जात सर्वकालीन उच्चांक गाठला.

सोने दरवाढीचे कारण काय?

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दराने उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली असून दर प्रति औंस २,१२६ डॉलरवर (प्रति औंस म्हणजे २८.३४ ग्रॅम) सर्वकालीन उच्चांकाजवळ गेला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये सोन्याचा दर प्रति औंस २,१४९ डॉलरवर गेला होता. उच्च व्याजदर आणि इक्विटी मार्केट मजबूत असूनही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात तेजी कायम राहिली आहे. जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणाव यासह विविध घटक सोन्याच्या दरातील वाढीला कारणीभूत असल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news