भारतात ऐन सणासुदीत सोने (Gold Rates) आणखी महाग होण्याची शक्यता आहे. त्याला कारण म्हणजे काही बँकांनी भारताला सोन्याचा पुरवठा कमी केला आहे. सोन्याचा पुरवठा करणार्या बँकांनी चीन, तुर्कस्तान आणि इतर बाजारपेठांवर लक्ष केंद्रित केले आहे. या देशांतून सोन्याला अधिक दर ऑफर केला जात आहे. तर ऐन सणासुदीच्या तोंडावर भारताला केला जाणारा पुरवठा कमी केला आहेत. तीन बँक अधिकारी आणि दोन व्हॉल्ट ऑपरेटरने याबाबतची माहिती दिली आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.
यामुळे सोन्याच्या जगातील दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारतात सोन्याचा तुटवडा निर्माण होऊ शकते. सणासुदीत सोन्याची खरेदी केली जात आहे. यामुळे मागणी वाढते. यामुळे भारतीय खरेदीदारांना ऐन सणासुदीत सोन्याच्या पुरवठ्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागू शकते. भारताला सोन्याचा पुरवठा करणाऱ्यांमध्ये ICBC स्टँडर्ड बँक, जेपी मॉर्गन आणि स्टँडर्ड चार्टर्ड यांचा समावेश आहे. हे पुरवठादार सणांच्या आधी अधिक सोन्याचा भारताला पुरवठा करतात. पण भारतात सोने आयात करणाऱ्यांच्या तिजोरीत सध्या १० टक्क्यांपेक्षा कमी सोन्याचा साठा आहे जो त्यांनी वर्षभरापूर्वी केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
"सणासुदीच्या काळात तिजोरीत काही टन सोने असायला हवे. पण आता आमच्याकडे फक्त काही किलोच सोने आहे," असे मुंबईतील एका व्हॉल्ट अधिकाऱ्याने सांगितले आहे. दरम्यान, JPMorgan, ICBC आणि Standard Chartered यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला असल्याचे Reuters ने वृत्तात म्हटले आहे.
भारतात सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या बेंचमार्कवरील प्रीमियम १डॉलर -२ डॉलर प्रति औंसवर घसरला आहे. गेल्या वर्षी याच काळात तो सुमारे ४ डॉलर होता. गेल्या सप्टेंबर महिन्यात भारतात सोने आयातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. या महिन्यात ६८ टन सोने आयात करण्यात आले होते. तर तुर्कस्तानमध्ये सोन्याच्या आयातीत ५४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर हाँगकाँग मार्गे चीनची सोन्याची आयात ऑगस्टमध्ये सुमारे ४० टक्क्यांनी वाढून चार वर्षांच्या उच्चांकावर गेली आहे.
भारतात सध्या सण, उत्सवाचा काळ आहेत. भारतात दसरा, दिवाळीत सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या सणानंतर लग्नाचा हंगाम सुरू होतो. या हंगामात सोन्याच्या विक्रीतून मोठी आर्थिक उलाढाल होते. (Gold Rates)
हे ही वाचा :