Gold Prices: सुवर्ण उच्चांक… आता पुढे काय ?

Gold Prices
Gold Prices
Published on
Updated on


सोन्याच्या दराची झळाळी सातत्याने वाढत असून ही वाढ यापुढे अशीच राहणार का ? सोने घेणे पुढे ढकलावे का, आताच घ्यावे, असे प्रश्न सोने खरेदी करणाऱ्यापुढे आहेत. नेमके सोन्याचे दर का वाढत आहेत, तसेच भविष्यकाळात सोने गुंतवणूक फायद्याची ठरेल का, या प्रश्नाचा सविस्तर आढावा घेतल्यास योग्य निर्णय घेणे सोपे होईल. (Gold Prices)

'ही' आहेत सोन्याच्या दरवाढीची महत्त्वाची कारणे?

भारतीय सुवर्ण भारतीय बाजारात प्रति १० ग्रॅमचा २४ कॅरटचा दर ७० हजारांपर्यंत वाढला असून कदाचित आठवड्यात ७२ हजारांचा उच्चांक प्रस्थापिक करेल, असा अंदाज आहे. केवळ भारतीय बाजारातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने उच्च दर पातळी गाठत असून ही वाढ २०२४ मध्ये सातत्य टिकवेल. गल्या चार दशकांत सोने १९८० मध्ये १,८०० वरून १९९० मध्ये ३,२०० तर २००० मध्ये ४,५०० व २०१० मध्ये २६,००० असा टप्पा गाठू शकले; मात्र २०१२ मध्ये ३१,५०० पर्यंत पोहोचलेले सोने २०१५ मध्ये २६,००० पर्यंत घसरले. ही घसरण मात्र २०१६ नंतर २०२१ पर्यंत दिसली नाही. सोने ५२,००० पर्यंत पोहोचल्यावर २०२२ मध्ये ते ४८,५०० झाले. २०२३ व २०२४ ही वर्षे मात्र सुवर्ण झळाळी वाढणारी ठरली. सोन्याच्या दरवाढीची जी महत्त्वाची कारणे आहेत, त्यामध्ये जागतिक घटक, भूराजकीय घटक, उत्पादन प्रमाण, डॉलरचा प्रभाव, लग्न समारंभ व दागिने यासाठी असणारी मागणी व गुंतवणुकीचे सुरक्षित साधन यांचा समावेश होतो. रशिया व चीन यांचे अर्थकारण हाही एक महत्त्वाचा घटक ठरतो. (Gold Prices)

चीनमध्ये देखील सुवर्ण गुंतवणूकीत वाढ

सोने हे गुंतवणुकीचे अत्यंत सुरक्षित मानले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्ध, मंदी, सत्तांतर अशा प्रतिकूल शक्यता निर्माण होतात तेव्हा गुंतवणुकीचे सुरक्षित साधन म्हणून सोने निवडले जाते. युक्रेन व रशिया युद्धाचा परिणाम म्हणून सोने गुंतवणूक मागणी वाढली. रशियावर-अमेरिकेने आर्थिक प्रतिबंध लादल्याने रशियाचे डॉलर व्यवहार थांबून ते सोन्यात परावर्तीत केले. तेल निर्यात मोबदला सोन्यात स्वीकारणे सुरू केल्याने सोने मागणी वाढली. रशियाची अर्थव्यवस्था पूर्णतः कर्जमुक्त झाल्याने व व्यापारामध्ये अधिक्यच असल्याने आपली आर्थिक कुवत सुवर्णसाठ्याने वाढविणे हे रशियन धोरण सोन्याच्या किमती वाढण्यास कारक ठरले. त्याच्या जोडीला आता चीनदेखील सुवर्णसाठे वाढवत असून कौटुंबिक स्तरावरही आता चीनमध्ये सुवर्ण गुंतवणूक वाढत आहे. (Gold Prices)

डॉलर, व्याज दर व महागाई यांचे त्रिकूट

सोन्याच्या दरवाढीमागे असणारे अंतरराष्ट्रीय अर्थकारण हे डॉलर-व्याजदर व महागाई दर नियंत्रण यात दिसते. डॉलर हे प्रबळ असे चलन गुंतवणुकीचे साधन म्हणूनही वापरले जाते. डॉलरमध्ये परतावा अधिक असतो तेव्हा सोन्याऐवजी डॉलरची मागणी केली जाते; पण डॉलर हा कमी परतावा देणारा ठरण्याची शक्यता दिसताच ती गुंतवणूक सोने गुंतवणुकीकडे वळते. अमेरिकेने महागाई नियंत्रणास डॉलरचा पुरवठा मर्यादित करणे व व्याज दर वाढवणे अशी फेडरेट धोरण चौकट स्वीकारली होती; पण आता व्याज दर घटीचे संकेत अमेरिका देत असून त्यातून डॉलर इंडेक्स घटत आहे. डॉलर इतर चलनांच्या तुलनेत स्वस्त होत आहे, असा घटत्या डॉलर इंडेक्सचा अर्थ आहे. त्यातून डॉलर गुंतवणूक सोन्यासारख्या इतर पर्यायाकडे वळते.

अमेरिकेने आर्थिक प्रतिबंध लादल्याने रशियाचे डॉलर व्यवहार थांबून ते सोन्यात परावर्तीत केले. तेल निर्यात मोबदला सोन्यात स्वीकारणे सुरू केल्याने सोने मागणी वाढली. रशियाची अर्थव्यवस्था पूर्णतः कर्जमुक्त झाल्याने व व्यापारामध्ये अधिक्यच असल्याने आपली आर्थिक कुवत सुवर्णसाठ्याने वाढविणे हे रशियन धोरण सोन्याच्या किमती वाढण्यास कारक

Gold Prices: उत्पादन, मागणी व पुरवठा

सोन्याच्या उत्पादनात चीन, रशिया, अॅस्ट्रोलिया, कॅनडा हे प्रमुख देश आहेत. सोन्याच्या उत्पादनाचा खर्चही वाढत असल्याने सोने किंमत वाढते. यातील प्रमुख उत्पादक देश निर्यातीऐवजी सोने खरेदी करत असल्याने सोने पुरवठा मर्यादित राहतो, तर सोने मागणी १८ टक्क्यांनी यावर्षी वाढली आहे. सर्वच देशातील मध्यवर्ती बँका आपल्या चलनास आधार म्हणून सोने ठेवत असल्याने ही मागणीदेखील सोने दर वाढवते. एकूण उत्पादन कमी, खर्चात वाढ, पुरवठा कमी व मागणी मोठी असे चित्र सोने किंमत वाढवते.

परिणाम व गुंतवणूक दिशा

सोन्याच्या वाढत्या किमती सुवर्ण ग्राहकांना अडचणीच्या ठरत असल्याने अल्प प्रमाणात मागणीत घट होऊन सुवर्णकार उद्योगासही अडचण होण्याची शक्यता निर्माण होते. तथापि, हे अल्पकालीन चित्र बदलून पुनःश्च सराफी बाजार पूर्वपदावर येतोच! सुवर्ण कर्ज बाज- ारपेठ सोन्याच्या वाढत्या किमतीने विस्तारले. कारण, आता तेवढ्याच सोन्यावर अधिक कर्ज दिले जाते. वाढत्या सोन्याच्या किमतीवर सरकारला अधिक कर उत्पन्न मिळकत असल्याने हा सरकारी लाभ सरकारला उपयुक्त ठरतो. दुसऱ्या बाजूला सुवर्ण आयात बिल वाढल्याने आयात-निर्यात तूट वाढते व रुपया आणखी घसरतो. वाढत्या सुवर्ण किमतीच्या पार्श्वभूमीवर आता सुवर्ण गुंतवणूक करावी का? पुढे सोन्याच्या किमती कशा असतील याबाबत सोन्याची भाववाढ समायोजित पद्धतीने मोजल्यास तो दर ३.३५५ डॉलर म्हणजे सद्याच्या दराच्या दीडपट येतो. (हा दर १९८० मध्ये असणाऱ्या किंमत व भाववाढीवरून मोजला आहे.) त्यामुळे आगामी कालखंडात सोने स्वतः लखपती होण्याचे लक्ष्य पूर्ण करेल. सोने गुंतवणूक म्हणून घ्यावयाचे असल्यास ते सुवर्ण बाँड स्वरूपात घेणे अधिक योग्य असून त्यावर २.५ टक्के व्याजही मिळते. एकूण गुंतवणुकीत १० ते २० टक्के सुवर्ण गुंतवणूक भाववाढ विरोधक व सुरक्षित पर्याय म्हणून योग्य ठरते. तथापि, जोखीम पत्करण्यास ज्यांची तयारी आहे त्यांना गेल्या १० वर्षात शेअर बाजाराने १२ टक्के, तर सोन्याने ७ टक्के परतावा दिला आहे. हे विचारात घेता सुवर्णझेप आपल्यासाठी यथाशक्ती स्वीकारणे योग्य ठरते.

सोने व शेअर बाजार उच्चांकी

सोने व शेअर बाजार या दोहोत १९९९ नंतर वाढ दिसते. वास्तविक, सोने किंवा शेअर बाजार हा उच्चांकी असतो. गुंतवणूक साधनांची निवड करताना यापैकी एकास प्राधान्य दिले, तर शेअर बाजार तेजीत असतो तेव्हा सोने मंदीत असते व सोने तेजीत असेल, तर शेअर बाजारातील गुंतवणूक कमी होते व शेअर्स घसरतात, कोरोना काळात भारतात सोन्याचा दर सेन्सेक्सच्या दुप्पट होता. सध्या मात्र सोने व सेन्सेक्स हे मित्रपक्ष झाले असून त्यांची गतिमान मैत्री अनेक तज्ज्ञांना आश्चर्यचकीत करीत आहे.

गेल्या चार दशकांतील सोन्याचे दर

वर्ष          दर (रुपयांमध्ये)
१९८०              १८००
१९९०              ३२००
२०००              ४५००
२०१०              २६०००
२०१२              ३१,५००
२०१५             २६०००
२०२१             ५२०००
२०२२            ४८,५००

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news