Gold Price Update : सोने, चांदी दरात घसरण, जाणून घ्या प्रति तोळ्याचा भाव

File Photo
File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क

Gold Price Update : गेल्या आठवड्यात सोन्याचा दर ८ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर गेला होता. त्यानंतर आज सोमवारी सोन्याचा दर खाली आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी युक्रेन संकटावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे पडसाद दिसून आले. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड दर ०.२ टक्के घसरून दर १,८९३ डॉलर प्रति औंसवर आला. याआधी हा दर १,९०८ डॉलर प्रति औंस होता. हा गेल्या वर्षीच्या ३ जून नंतरचा सर्वांधिक दर होता. यूएस गोल्ड फ्यूचर्स (US Gold Futures) दर १,८९८ डॉलर प्रति औंसवर आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

जगात काही भागात तणावाची परिस्थिती अथवा संकटे निर्माण होतात त्यावेळी त्याचा परिणाम शेअर बाजारासह सोन्याच्या दरावर होतो. यामुळे गुंतवणूकदार सेफ हेवन मालमत्ता म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात. यामुळे सोने तेजीत येते. गेल्या अशीच परिस्थिती निर्माण झाली होते. यामुळे सोने ८ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले होते.

दरम्यान, भारतीय सराफा बाजारात (Gold Price Update) आज शुद्ध सोन्याचा दर (२४ कॅरेट) प्रति १० ग्रॅम ४९,९३८ रुपयांवर खुला झाला. २३ कॅरेट सोने ४९,७३८ रुपये, २२ कॅरेट सोने ४५,७४३ रुपये, १८ कॅरेट सोने ३७,४५४ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २९,२१४ रुपयांवर होता. तर चांदीचा दर प्रति किलो ६३,४६१ रुपये होता. (हे दुपारी १२ नंतरचे अपडेटेड दर असून त्यात बदल होऊ शकतो)

सराफा बाजारात गेल्या शुक्रवारी (दि.१८) शुद्ध सोन्याचा दर (२४ कॅरेट) प्रति १० ग्रॅम ४९,९९२ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. तर २३ कॅरेट सोने ४९,७७२ रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर ४५,७७४ रुपये होता. त्यात आज किचिंत घट झाली.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news