Gold and Silver : सोन्याला झळाळी, चांदीलाही उजाळा

Gold and Silver : सोन्याला झळाळी, चांदीलाही उजाळा
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीचे दर वाढत चालल्याचे दिसत असून, गुरुवारी सोन्याच्या दरात 430 रुपयांनी वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 64,250 रुपये प्रतितोळा झाली आहे. दुसरीकडे चांदीच्या दरातही 300 रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी चांदीचा दर प्रतिकिलो 79,500 रुपये प्रतिकिलो होता. अर्थात जीएसटी आणि अन्य करांमुळे सोने-चांदीच्या किमती विविध ठिकाणी थोड्याफार फरकाने कमी-जास्त असतात. (Gold and Silver)

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात चढ-उतार होत आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून लग्नसराईच्या काळात सोन्याला चांगली झळाळी मिळाली आहे. गुडरिटर्न्सनुसार गुरुवारी 18 कॅरेट सोन्याचा दर 48,190 रुपये प्रतितोळा, 22 कॅरेट सोन्याचा दर 58,900 रुपये प्रतितोळा, तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 64,250 रुपये प्रतितोळा होता. (Gold and Silver)

गुरुवारी चांदीच्या दरातही 300 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. त्यानुसार गुरुवारी चांदाचा दर प्रतिकिलो 79,500 रुपये होता. देशातील चार प्रमुख महानगरांचा विचार केला तर 24 कॅरेट सोने चेन्नईत 450 रुपयांनी, दिल्लीत 440 रुपयांनी, तर मुंबईत आणि कोलकाता येथे 430 रुपयांनी महागले आहे.

या घटकांमुळे दरांत चढ-उतार

सोने आणि चांदीच्या किमतीवर अनेक घटकांचा प्रभाव पडतो. सोन्याची जगभरातील मागणी, देशांमधील चलन मूल्यांमधील फरक, सध्याचे व्याज दर आणि सोन्याच्या व्यापारासंबंधीचे सरकारी नियम यासारखे घटक या बदलांमध्ये भूमिका बजावतात. शिवाय जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणि इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची क्षमता यासारख्या जागतिक घटनांचाही भारतीय बाजारातील सोने-चांदीच्या किमतींवर प्रभाव पडतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news