Gmail New Iook : आता ‘जीमेल’ नवीन लूक आणि फिचर्समध्ये, काय आहे नेमका बदल?

Gmail New Iook : आता ‘जीमेल’ नवीन लूक आणि फिचर्समध्ये, काय आहे नेमका बदल?

पुढारी ऑनलाईन :

Google ने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते की, आम्ही Gmail नवीन स्वरूपात (Gmail New Iook) घेऊन येत आहोत. यानुसार येत्या काही दिवसांत Gmail नवीन लूक आणि फिचर्समध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. Google कडून Gmail चे रिडिझाईन करण्यात आले आहे. तसेच Gmail वेबवर अनेक नवीन फिचर्सही समाविष्ट करण्यात आले आहेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत Gmail चे नवीन डिझाईन वापरकर्त्यांपर्यंत पोहोचेल असे गुगने सांगितले आहे.

वैयक्तिक Google खाते असलेले आणि डोमेन वापरकर्त्यांसाठी Gmail च्या अद्ययावत सेवा 28 फेब्रुवारीपासून सुरू होतील असे, कंपनीने सांगितले आहेत. गुगलचे म्हणणे आहे की, Gmail नवीन व्हीवमध्ये Gmail, Chat and Meet सारख्या महत्त्वपूर्ण ऍप्लिकेशन्समध्ये (Gmail New Iook) एकाच ठिकाणहून जाणे सोपे होणार आहे. स्क्रीनच्या डावीकडे pill-shaped icons असेल Gmail, Chat and Meet मध्ये जाता येईल.

Chat मध्ये काम करत असताना, वापरकर्त्याला एका स्क्रीनमध्ये चॅट पाहता येणार आहे. चॅट दरम्यान engage राहत, याचे संचलन करणे शक्य होणार आहे. Gmail च्या इनबॉक्समध्ये असतानाच, वापरकर्त्याला मेल आणि लेबल पर्यायाही (Gmail New Iook) वापरता येणार आहेत. Gmail चे नवीन डिझाइन सूचना बुडबुडेदेखील आणते जे वापरकर्त्याचे त्वरित लक्ष देण्याची आवश्यकता असलेल्या शीर्षस्थानी राहणे सोपे करते. Gmail वर काही notification आल्यास वापरकर्त्याला bubbles च्या सहाय्याने सुचना देतं त्याचे लक्ष वेधले जाईल. Gmail चे नवीन बदल अद्याप प्रमाणात कार्यरत नाहीत, असेही Google ने स्पष्ट केले आहे.

नवीन Gmail असे करा कार्यरत

  • स्क्रीनच्या उजवीकडे सेटिंग्ज वर क्लिक करा
  • Quick Settings सर्च करा आणि त्यानंतर new Gmail view वर क्लिक करा
  • हे एक नवीन विंडो उघडेल, त्यामध्ये Reload वर क्लिक करा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news