पुढारी ऑनलाईन डेस्क : Global Covid Cases : गेल्या महिन्यात जगभरात कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ नोंदवली गेली आहे. यात नवीन कोविड बाधितांची संख्या 80 टक्क्यांनी वाढली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी सांगितले. दरम्यान, डब्ल्यूएचओने बुधवारी (9 ऑगस्ट) अमेरिका आणि चीनमध्ये पसरत असलेल्या ईजी.5 या कोरोना विषाणू स्ट्रेनचे वर्गीकरण 'इंटरेस्ट ऑफ व्हेरिएंट' म्हणून करण्यात आले आहे. पण हा विषाणू इतर प्रकारांपेक्षा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे.
कोविड 19 ही जागतिक आरोग्य आणीबाणी नाही. याबाबतची घोषणा डब्ल्यूएचओने मे महिन्यात केली होती. पण कोरोना विषाणू प्रसारित आणि उत्परिवर्तित होत राहील ज्यामुळे संक्रमण, रुग्णांच्या मृत्यूंमध्ये अधूनमधून वाढ होईल, अशी चेतावणीही त्यावेळी देण्यात आली होती. (Global Covid Cases)
डब्ल्यूएचओनेने म्हटले आहे की 10 जुलै ते 6 ऑगस्ट या कालावधीत जवळपास 1.5 दशलक्ष नवीन रुग्णसंख्या नोंदवली गेली, जी मागील 28 दिवसांच्या तुलनेत 80 टक्क्यांनी वाढली आहेत. पश्चिम पॅसिफिक देशांत अनेक नवे रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यात कोरोनाचे संक्रमण 137 टक्क्यांनी वाढले आहे. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि जपानसह अनेक देशांमध्ये अलिकडच्या आठवड्यात कोरोना बाधितांची संख्या उन्हाळ्यात वाढली आहे. (Global Covid Cases)
दरम्यान, अनेक देशांमध्ये महामारीच्या पूर्वीच्या टप्प्यांपेक्षा खूपच कमी चाचणी होत आहे. त्यामुळे डब्ल्यूएचओने चेतावणी दिल्याप्रमाणे रुग्णसंख्या आणि मृत्यूची संख्या खरी संख्या दर्शवत नसल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सार्स-कोव-2 चे EG.5 किंवा Eris हा प्रकार प्रथम या वर्षी 17 फेब्रुवारी रोजी नोंदवला गेला. त्यानंतर 19 जुलै रोजी संशोधनाअंती एक प्रकार (VUM) म्हणून त्याची नोंद करण्यात आली. WHO ने बुधवारी EG.5 आणि त्याचा उपप्रकाराला VOI म्हणून नियुक्त केले. त्यात म्हटले आहे की EG.5 हे Omicron format XBB.1.9.2 चा एक प्रकार आहे. या वर्षी मे महिन्यात भारतात EG.5 चे फक्त एक प्रकरण नोंदवले गेले आहे. हा रुग्ण महाराष्ट्रीतील पुण्यात आढळला होता. (Global Covid Cases)