Benefits of buttermilk : उन्हाळ्यात रोज एक ग्लास ताक लाभदायक

Benefits of buttermilk
Benefits of buttermilk

नवी दिल्ली : सध्या कडक उन्हाळा सुरू असून या ऋतूमध्ये स्वत:ला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आरोग्यदायी गोष्टींचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. तुम्हालाही या उन्हाळ्यात उष्णतेची लाट आणि पाण्याची कमतरता टाळायची असेल, तर तुम्ही रोज एक ग्लास ताक पिऊ Benefits of buttermilk शकता. त्यापासून अनेक लाभ मिळतात, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

दह्यापासून ताक Benefits of buttermilk तयार केले जाते. व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई सारखे अनेक प्रकारचे पोषक घटक ताकामध्ये आढळतात. जे शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करते. ताक हे एक सुपर हेल्दी पेय आहे, जे उष्णतेपासून संरक्षण आणि शरीराला थंड ठेवते. चला तर मग विलंब न लावता जाणून घेऊया. उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे – पाण्याची कमतरता भासत नाही. ताक हे पोषक तत्त्वांचे भांडार आहे. त्यात मीठ, साखर आणि पुदिना टाकून प्यायल्याने डिहायड्रेशन, डायरिया आणि उष्णता टाळता येते. या पेयाचे सेवन केल्याने पाण्याची कमतरता भासत नाही.

पोटासाठी योग्य : अ‍ॅसिडीटी आणि पोटात जळजळ होत असेल तर ताकाचे सेवन Benefits of buttermilk लाभदायक ठरते. जेवणानंतर ताक पिल्याने आम्लपित्त आणि पोटातील जळजळीपासून आराम मिळतो. वजन कमी करण्यात मदत होते – उन्हाळ्यात वजन कमी करणे खूप कठीण होऊन बसते. तुम्हालाही तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही ताक सेवन करू शकता. ताकामध्ये कॅलरीज आणि फॅट कमी असते.

उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने चरबी लवकर जाळली जाऊ शकते. त्वचा निरोगी राहते- उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. तुम्हालाही तुमची त्वचा निरोगी ठेवायची असेल तर तुम्ही ताक सेवन Benefits of buttermilk करू शकता. प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए हे गुणधर्म ताकामध्ये आढळतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news