पुणे: ‘एफटीआयआय’मध्ये तरुणींची आत्महत्या, बेडशीटने पंख्याला घेतला गळफास

पुणे: ‘एफटीआयआय’मध्ये तरुणींची आत्महत्या, बेडशीटने पंख्याला घेतला गळफास
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: फिल्म अ‍ॅण्ड टेलीव्हीजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मध्ये शिक्षण घेणार्‍या एका 25 वर्षीय तरुणीने गुरुवारी दुपारी बेडशीटच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कामाक्षी बोहरा (वय 25, मूळ उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मात्र आत्महत्येच्या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामाक्षी ही मुळची नैनिताल, उत्तराखंड येथील राहणारी आहे. 2019 पासून येथील वसतीगृहात राहण्यास आहे. ती पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन अ‍ॅक्टींग या कोर्सचे शिक्षण घेत होती. ती एकटीच खोलीत राहत होती. तसेच फारशी ती कोणात मिसळत नव्हती. दरम्यान, गुरुवारी कामाक्षी क्लासमध्ये न आल्याने शिक्षकांनी काही विद्यार्थीनींना ती राहत असलेल्या खोलीत जाऊन पाहण्यास सांगितले. त्यावेळी तिने गळफास घेतल्याचे दिसून आले. याची माहिती डेक्कन पोलिसांना देण्यात आली होती. डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्यासह अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. नैराश्यातून तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, मागील महीन्यात 5 ऑगस्ट रोजी येथील हॉस्टेलमध्ये एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यानंतर महिनाभरातच दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news