मुख्यमंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले? ; गिरीश महाजन यांची उद्धव ठाकरेंवर टीका
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जळगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेचा मंत्री गिरीश महाजन यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, देवेंद्रजींबद्दल उद्धव ठाकरे बोलत होते, तेव्हा त्यांची मला कीव येत होती. फस्ट्रेशन आल्याने ते असे बोलत आहेत. त्यांच्या मागे कोणी राहिले नाही म्हणून ते अस्वस्थ आहेत. आम्हाला त्यांचे शारीरिक व्यंग काढायचे नाही. पंतप्रधान यांच्यावर त्यांनी काय बोलावे? विरोधी पक्षात आहे म्हणून त्यांना बोलावे लागते. पण, त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवेल का? विश्वासार्हता असायला पाहिजे ? मुख्यमंत्री असताना तुम्ही काय दिवे लावले? अशी टीका महाजन यांनी ठाकरेंवर केली.
महाजन यांनी सोमवारी (दि.११) नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. . मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातूनच मार्ग निघेल. या मुद्द्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जरांगे-पाटील यांनी शासनाला वेळ द्यायला हवा, सरसकट कुणबी आरक्षण देण्याचा जीआर काढला तर तो कोर्टात टिकणार नाही असा दावा महाजन यांनी यावेळी केला.
सातारा येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाजन म्हणाले की, राज्यात कुणाला अस्थिरता माजवायची आहे? कुणाला दंगली घडवायच्या आहेत? याची चौकशी झाली पाहिजे. जाणीवपूर्वक अस्थिरता कोण निर्माण करतय? कोण खतपाणी घालत आहे, याचीही चौकशी पोलिस करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. संजय राऊत हे लोकांना उचकवायला लागले आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे. उद्धव ठाकरे अतिशय बालिश स्टेटमेंट करत आहेत. त्यांनाच काही घडवून तर आणायचं नाही ना?. याची चौकशी झाली पाहिजे पोलिसांनी यांनाच ताब्यात घेतले पाहिजे, असे महाजन म्हणाले.
हेही वाचा :