Giant Wheel Stops Working : जत्रेतला पाळणा पडला बंद, अर्धा तास लोकांचा जीव टांगणीला

Giant Wheel Stops Working : जत्रेतला पाळणा पडला बंद, अर्धा तास लोकांचा जीव टांगणीला
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील रामलीला मैदानात नवरात्रीनिमीत्त सुरू असलेल्या जत्रेतील मोठा पाळणा अचानक बंद पडल्याने मोठा गोंधळ उडाला. काही महिला आणि लहान मुलेही या पाळण्यावर स्वार होती. अचानक झालेल्या या प्रकारामुळे लोकं घाबरली आणि काही काळ एकच खळबळ माजली. यात अडकलेल्या लोकांना पायऱ्यांच्या साहाय्याने खाली आणण्यात आले. ही घटना काल (दि. 18) रात्री घडली. या संपुर्ण घटनाक्रमामध्ये मोठी दुर्घटना टळली. यासंदर्भात पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

रामलीला मैदानावर मोठ्या आकाराच्या जायंट व्हील स्विंगवर अनेक लोक आनंद घेत होते. यावेळी पाळण्याचा काही भाग तुटला आणि काही लोक त्यात अडकले. बराच वेळ पाळणा सुरू न झाल्याने काही लोकांनी भीतीने जीव वाचवण्यासाठी स्विंगवरून उड्या मारल्या. काही लोकांनी पाळण्यावर असलेले अँगल धरून खाली उतरण्याचा प्रयत्न सुरू केला. अशी माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, जे स्वताची सुटका करू शकले नाही, अशा 20 जणांना वाचवण्यात यश आले. या घटनेत सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. यात कुणालाही गंभीर ईजा झाली नाही आणि मोठी हानी टळली. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news