खळबळजनक…गाझियाबादमध्‍ये वकिलाची गोळ्या झाडून हत्या

खळबळजनक…गाझियाबादमध्‍ये वकिलाची गोळ्या झाडून हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील तहसील परिसरात वकिलाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्‍याची खळबळजनक घटना आज (दि.३०) घडली. ही घटना सीसीटीव्‍हीमध्‍ये कैद झाली असून पोलीस हल्‍लेखोरांचा शोध घेत आहेत.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये आज दुपारी वकील मनोज चौधरी आपल्या चेंबरमध्ये जेवण करत होते. यावेळी दोन अज्ञात हल्लेखोर तेथे आले. त्‍यांनी मनोज यांच्‍या गोळीबार केला. चेंबरमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्‍ये ही घटना कैद झाली आहे.

या घटनेबददल माहिती देताना गाझियाबाद शहराचे पोलिस उपायुक्त निपुण अग्रवाल म्हणाले, "आज दुपारी वकील मोनू चौधरी उर्फ मनोज चौधरी यांची गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आल्‍याचे माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्‍काळ घटनास्‍थळी धाव घेतली. पोलिस मारेकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी फुटेज तपासत आहेत. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news