Gazal Dhaliwal चा संदीप रेड्डी वांगावर मोठा आरोप, ‘कथेचं क्रेडिट दिलं गेलं नाही…’

गजल धालीवाल
गजल धालीवाल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नेटफ्लिक्स इंडियाचा शो 'मिसमॅच्ड'ची स्क्रीनरायटर गजल धालीवालने संदीप रेड्डी वांगावर संताप व्यक्त केला आहे. 'ॲनिमल'च्या कथेचा आणि डायलॉग्जचे क्रेडिट न मिळाल्याने तिने या चित्रपटाचे दिगेदर्शक संदीप रेड्डी वांगावर नाराजी व्यक्त केलीय. गजल धालीवालने दिग्दर्शकाचे नाव न घेता सोशल मीडिया पोस्टमध्ये खरं-खोटं ऐकवलं. तिने दावा केला आहे की, संदीप रेड्डी वांगा शिवाय, 'ॲनिमल'ची कहाणी आणखी तीन लेखकांनी लिहिली होती, पण क्रेडिट दिलं गेलं नाही. Gazal Dhaliwal ला आश्चर्य वाटत आहे की, Sandeep Reddy Vanga यांनी कशाप्रकारे चित्रपटाच्या ओपनिंग क्रेडिट्समध्ये स्वत:ला 'ॲनिमल'चे 'रायटर-एडिटर आणि डायरेक्टर' सांगितलं आहे. (Gazal Dhaliwal)

संबंधित बातम्या –

संदीप रेड्डी वांगा यांच्यावर भडकली गजल धालीवाल

गजल धालीवालने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'ॲनिमल'चा ओपनिंग क्रेडिटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिलं, 'एक असा चित्रपट निर्माता, ज्याने आपल्या चित्रपटाच्या टॉप क्रेडिटमध्ये स्वत:ला 'रायटर' म्हटले आहे. पण, इतर लेखक आहेत. ज्यांनी चित्रपटाचा स्क्रीनप्ले आणि डायलॉग लिहिलं…'

गजल धालीवालने सांगितलं की, 'ॲनिमल'ची कहाणी त्यांचे भाऊ प्रणय रेड्डी वांगा आणि सुरेश बंडारू यांनीही लिहिलीय. तर डायलॉग सौरभ गुप्ता यांनी लिहिले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news