Kapil Dev Kidpanning Video : कपिल देव यांचे अपहरण? ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Kapil Dev Kidpanning Video : कपिल देव यांचे अपहरण? ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : Kapil Dev Kidpanning Video : कपिल देव यांची गणना भारतातील महान क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. कपिल देव यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो पाहून क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. माजी क्रिकेटर गौतम गंभीरनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कपिल देव यांचे हात बांधलेले आहेत आणि तोंडात कापड ठेवले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही लोक दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना हात बांधून आणि तोंडावर कापड लावून घेऊन जात असल्याचे दिसत आहेत. जणू काही त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेच हे चित्र आहे. व्हिडिओमध्ये कपिलदेव मागे पाहत आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना गौतम गंभीरने लिहिलंय की, ही व्हिडीओ क्लिप इतर कोणाला मिळाली आहे का? मला आशा आहे की ते प्रत्यक्षात कपिल देव नाहीत आणि कपिल पाजी ठीक आहेत.' गंभारने कपिल देव यांना टॅग देखील केले आहे. कपिल देव यांनी गंभीरच्या या व्हिडीओवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी क्रिकेट चाहत्यांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे.

व्हिडिओवर क्रिकेट चाहते संतापले (Kapil Dev Kidpanning Video)

गौतम गंभीरच्या व्हिडीओवर क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका चाहत्याने व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लिहिले की, डायरेक्ट कॉल करा आणि हा व्हिडीओ तुमच्या कॉन्टॅक्टसोबत शेअर करू नका, असे लोक चुकीचा अर्थ काढतात. दुसर्‍या यूजरने लिहिलंय की, ही जाहिरात आहे का? आणि जर ती जाहिरात असेल तर ती अत्यंत खराब पद्धत आहे.

जाहिरात शूटिंग! (Kapil Dev Kidpanning Video)

कपिल देव यांचा हा व्हिडिओ अॅड शूटिंगचा भाग असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ही जाहिरात कुठे शूट केली जात आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news