पुढारी ऑनलाईन डेस्क : Gambhir on Virat Kohli : विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 117 धावांची ऐतिहासिक खेळी केली. किंग कोहलीचे हे वनडेतील 50 वे शतक ठरले. त्याने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला मागे टाकले. यासह वनडेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम आपल्या नावावर केला. कोहलीने (Virat Kohli) आपले 50 वे शतक पूर्ण केले तेव्हा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) देखील वानखेडे स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होता. शतक पूर्ण केल्यानंतर कोहलीने प्रथम तेंडुलकर जिथे बसला होता त्या दिशेने नतमस्तक होऊन अभिवादन केले.
कोहलीवर (Virat Kohli) सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यात त्याचा टीकाकार गौतम गंभीरही मागे नाही. गंभीरने (Gautam Gambhir) चक्क कौतुक करून कोहलीच्या रेकॉर्डब्रेक शतकावर प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या या माजी खेळाडूने याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली आहे. '50 व्या शतकाबद्दल विराट कोहली तुझे अभिनंदन. सचिन तेंडुलकरच्या पुढे जाणे ही मोठी कामगिरी आहे. मला खात्री आहे की त्याच्या दिवंगत वडिलांना आज खूप अभिमान वाटत असणार. ते स्वर्गातून आपल्या मुलाकडे गर्वने पाहत असतील. त्यांच्या चेह-यावर हास्य असेल. विराट तू या पिढीतील आतापर्यंतचा सर्वात महान खेळाडू आहेस.' (Gautam Gambhir on Virat Kohli)
कोहलीने (Virat Kohli) 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिले वनडे शतक झळकावले होते, तेव्हा गंभीरनेही त्या सामन्यात शतक झळकावले होते. गंभीरला ऑफिशियल प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला. जेव्हा गंभीर हा पुरस्कार घेण्यासाठी आला तेव्हा गंभीरने कोहलीला तिथे बोलवून त्याला मिळालेला हा पुरस्कार कोहलीला प्रदान केला होता. याबाबत गंभीर म्हणाला होता की, 'या सामन्यात कोहलीने त्याचे पहिले शतक झळकावले आहे. पहिले शतक कोणत्याही खेळाडूसाठी खूप खास असते. मला कोहलीचे पहिले शतक संस्मरणीय बनवायचे होते.' (Gautam Gambhir on Virat Kohli)
गंभीर (Gautam Gambhir) आणि कोहलीचे चाहतेही अनेकदा सोशल मीडियावर भांडताना दिसतात. अशा स्थितीत कोहलीबाबत गंभीरने दिलेले प्रत्येक विधान चर्चेचा विषय बनते. मात्र, यादरम्यान असे अनेक प्रसंग पाहायला मिळाले आहेत जेव्हा गंभीरने कोहलीच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. या क्रमाने, आता त्याने त्याच्या 50 व्या एकदिवसीय शतकासाठी त्याचे अभिनंदन केले आहे, ज्यानंतर चाहते देखील खूप आनंदी दिसत आहेत.
वास्तविक, आयपीएल 2023 दरम्यान नवीन-उल-हक आणि विराट कोहली यांच्यातील वादात गौतम गंभीरही पडला होता. त्यानंतर विराट आणि गंभीरमध्ये बाचाबाची झाली होती आणि इथून दोघांमधील मतभेद वाढतच गेले होते, जे लपून राहिलेले नाही. याआधी 2013 च्या आयपीएलमध्येही विराट आणि गंभीरमध्ये मैदानावर वाद झाला होता.