Gauahar Khan: गौहरने जस्टिन बीबर-हेलीला सुनावले खडेबोल

gauahar khan -Justin Bieber
gauahar khan -Justin Bieber
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री आणि 'बिग बॉस ७' ची विजेती गौहर खानची प्रेग्नेंसी विषयी चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर गौहरची तगडी फॅन फॉलोईंगदेखील आहे. गौहरने जस्टिन आणि हेली बीबरला खडेबोल सुनावले आहेत. गौहरचे कुणी समर्थन करत आहे तर कुणी टिका करत आहे. काही लोक गौहरला सल्ले देत आहेत. जाणून घ्या काय आहे प्रकरण…

हॉलीवूडचा दिग्गज गायक जस्टिन बीबर आणि हेली बीबरने रमजानमधील रोजावरून (उपवास) आक्षेपार्ह कमेंट केलं होतं. त्यानंतर त्य़ांना सोशल मीडियावर खूप कमेंट्सचा सामना करावा लागला होता. गौहर खाननेदेखील आपल्या इन्स्टाग्राम हँडल स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हे सिद्ध होतं की, तो किती मूर्ख आहे. यामागील सायन्सविषयी माहिती नाही आणि यामुळे आरोग्याला काय लाभ आहेत, माहिती नाहीये त्यांना! कुठून तरी ज्ञान घ्या जस्टिन बीबर आणि हेली बीबर. आणि आधी नीट बोलायला शिका.'

एका मुलाखतीत जस्टिन बीबर म्हणाला, 'मला खरचं याविषयी विचार करायसा हवा की मी याआधी असं कधीच केलं नव्हतं. मला वाटतं की, आपल्या शरिरासाठी ताकद आणि पोषणाची गरज असते. जे उपवासाने नाही मिळू शकत. हेलीने हे देखील खुलासा केला आहे की, उपवास ठेवणं कधीही तिला समजलं नाही.'

हेलीने पुढे म्हटलं आहे '…पण मला सर्व सोडून उपवास करणे समजत नाही. आपल्या शरीराला पोषक तत्वांची गरज असते. ते न खाता कसे मिळू शकते. उपवास माझ्यासाठी महत्त्वाचे ठरत नाही'.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news