Gauahar Khan : गौहरने दिली खास अंदाजात ‘गूड न्यूज’ (Video)

gauahar khan-zaid darbar
gauahar khan-zaid darbar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खानने खास अंदाजात गूड न्यूज दिलीय. ती आणि तिचा पती जैद लवकरच आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्री गौहरने एक सुंदर व्हिडीओ शेअर करून फॅन्सना गुड न्यूज दिली आहे. व्हिडिओमध्ये गौहर (Gauahar Khan) आणि तिचा पती जैद दरबार कार्टून फॉर्ममध्ये दिसत आहे. अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीची घोषणा करण्याच्या या अंदाजामुळे लोक तिला खूप पसंत करत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये तिला खूप शुभेच्छा दिल्या जात आहेत. (Gauahar Khan)

गौहर खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत लिहिलं, 'आपलं प्रेम आणि आशीर्वादाची गरज आहे.' व्हिडिओमध्ये गौहर आणि जैद दोघे कार्टूनच्या फॉर्ममध्ये एका बाईकवर स्वार आहेत. त्यांनी लिहिलंय की 'जेव्हा G ची भेट Z शी झाली तेव्हा आम्ही एकाचे दोन झालो आणि आता लवकरच तीन होणार आहे. सोबत टेडी बिअर ठेवलेली दिसत आहे. गौहरने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर फॅन्स आणि मित्र तिला शुभेच्छा देत आहेत.

गौहर आणि जैदच्या लव्ह स्टोरीची गोष्ट करता ती खूप इंटरेस्टिंग आहे. दोघांची भेट लॉकडाऊनच्या दरम्यान, ग्रॉसरीच्या शॉपिंगवेळी एक दुकानात झाली होती. गौहरने जैदला स्टोरमध्ये पाहिलं होतं. जैदने गौहरला इन्स्टाग्रामवर मेसेज केला आणि दोघांमध्ये बातचीत सुरू झाली यानंतर हळूहळू मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर  प्रेमात झालं. दोघांनी डिसेंबर २०२० मध्ये लग्न केलं. लग्नाच्या दोन वर्षांनंतर दोघे आई-बाबा होणार आहेत.

गौहर खानने छोटा पडदा ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. याशिवाय ती ओटीटीवरदेखील अनेक शोजमध्ये दिसली. 'इश्कजादे' मध्ये गौहरचे गाणे 'छोकरा जवां रे' आणि 'झल्ला-वल्ला' सुपरहिट ठरले होते. नेहा कक्कडचे गाणे 'बारिश में तुम' मध्ये ती पती जैदसोबत दिसली होती.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news