नागपूर – वैशाली नगरात गॅस सिलिंडरचा स्फोट, तीन घरांना आग

नागपूर वैशाली नगर
नागपूर वैशाली नगर

नागपूर -उत्तर नागपूर येथील महर्षी दयानंद नगर, वैशाली नगर परिसरात आज रात्री गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एका मागोमाग एक तीन घरांना आग लागली. यात टीव्ही, फ्रिज अशा घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. एका सिलेंडरच्या गॅस गळतीने ही घटना घडल्याची माहिती धकाते कुटुंबियांनी दिली.

वैशाली नगर परिसरात अचानक गॅसची गळती व आग लागल्याचे कळताच तीन अग्निशमन गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आसपासच्या परिसरातील नागरिकही मदतीला धावून आले. एका सिलिंडरच्या गळतीमुळे ही घटना घडल्याची माहिती मनपा अग्निशमन सूत्रांनी दिली. डागा प्रसाद धकाते, ललित प्रसाद धकाते, शितल प्रसाद धकाते अशी घरमालकांची नावे असून या तिघांकडे सुमारे नऊ व्यावसायिक व्यापाराचे सिलिंडर होते. डागा प्रसाद यांच्याकडे पाच, ललित प्रसाद यांच्याकडे दोन तर शीतल प्रसाद यांच्याकडे दोन सिलेंडर होते. यापैकीच एकाची गॅस गळती व नंतर स्फोट झाला यात वरचे संपूर्ण नोझल उडाल्याने भीषण आग लागली. घराचे छप्पर उडाले तसेच घरगुती साहित्य आगी जळून खाक झाले. एकाच कुटुंबात इतके गॅस सिलिंडर कसे काय? याविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news