उद्यानांतील जॉगिंग ट्रॅक, ओपन जिमचा लाभ नागरिकांना होत आहे. सिमेंटच्या जंगलात उद्याने मनाला आनंद देत आहेत. कात्रज तलावात ओढ्याद्वारे वाहून येणारा कचरा व नागरिकांकडून टाकले जाणारे निर्माल्य याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.– श्रीराम कुलकर्णी, नागरिक, कात्रजकात्रज परिसरातील उद्यानांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम नियमित करण्यात येत आहे. मात्र, सुरक्षारक्षक मर्यादित असल्यामुळे अपप्रवृत्तीच्या लोकांकडून स्वच्छतागृहांत चोर्या होतात. सार्वजनिक सुविधांचा लाभ घेताना सुरक्षेची काळजी घेणे प्रशासनासह नागरिकांचेही कर्तव्य आहे.– योगेश ताम्हाणे, उद्यान निरीक्षक
हडपसर परिसरातील नागरिकांची गैरसोयलोहिया उद्यान सध्या विविध समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. दुरवस्था झालेली आसनव्यवस्था, प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे, प्रवेशद्वारावर अतिक्रमणे, पाण्याच्या टाकीची अस्वच्छता आदी समस्यांमुळे या बागेेचे अस्तित्व हरपल्यासारखे वाटत आहे. पाणी नसल्याने झाडे सुकून चालली आहेत. सुरक्षारक्षकांची कमतरता असल्याने नागरिक वाहने उद्यानात आणत आहेत.-बाळासाहेब माने, विकास हिंगणे, नागरिकलोहिया उद्यानात असलेल्या विविध समस्यांबाबत वरिष्ठ अधिकार्यांना कळविण्यात येईल. त्यानंतर उद्यानासाठी निधीची तरतूद करून या समस्या सोडविण्यात येतील. उद्यानात कुणी गैरप्रकार करताना आढळून असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमणांवरही कारवाई केली जाईल.-विजय नेवसे, उद्यान निरीक्षक