राऊतांनी जॉनी लिव्हरची उपमा देताच प्रत्युत्तरात केश्टो, गणपत पाटलांची उपमा

संजय राऊत
संजय राऊत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौर्‍यावर टीका करताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोदी यांना जॉनी लिव्हरची उपमा दिल्याने भाजप व शिंदे गट चांगलाच खवळला. भाजपने संजय राऊत यांना गणपत पाटील, तर शिंदे गटाने केष्टो मुखर्जी ही उपमा देत वादाला फिल्मी रूपच देऊन टाकले.

संबंधित बातम्या 

पंतप्रधान नरेंद्र मोदी रिझर्व्ह बँकेच्या कार्यक्रमासाठी सोमवारी मुंबईत आले होते. त्यांच्या दौर्‍यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, भ्रष्टाचार्‍यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई करणारच, असे मोदी यांनी मेरठ येथील सभेत सांगितले. हा मोठा विनोद ते दररोज करत आहेत. जॉनी लिव्हरनंतर हे गुजरातचा लिव्हर जनतेचे मनोरंजन करत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. भ्रष्टाचार्‍यांना सोडणार नाही, असे मोदी म्हणतात आणि त्यांच्या आजूबाजूलाच 10 भ्रष्टाचारी नेते बसलेले दिसतात, असे सांगतानाच देशातील सर्वात भ्रष्टाचारी पक्ष म्हणजे भाजप आहे, असेही ते म्हणाले.

त्यांच्या या विधानाने भाजप व शिंदे गट चांगलेच खवळले. भाजपचे आशिष शेलार यांनी संजय राऊत हे राजकारणातील गणपत पाटील असल्याची बोचरी टीका केली. शिवसेना शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही.

हीन भाषेत टीका ही उबाठा सेनेची संस्कृती : शेलार

उबाठा गटाचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत काँग्रेससमोर मुजरा सुरू आहे. अतिशय हीन आणि टवाळकीच्या भाषेत टीका करणे ही उबाठा सेनेची संस्कृती आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्र सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो. त्यामुळे असभ्य आणि असंस्कृत बोलणार्‍यांना महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कधीही स्थान दिलेले नाही, अशा शब्दात मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news