Ganpat Gaikwad firing Case : २४ दिवसांच्या उपचारानंतर महेश गायकवाड यांना डिस्चार्ज

Ganpat Gaikwad firing Case : २४ दिवसांच्या उपचारानंतर महेश गायकवाड यांना डिस्चार्ज

नेवाळी : पुढारी वृत्तसेवा: उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यासह राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात २४ दिवस उपचार सुरू होते. अखेर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. Ganpat Gaikwad firing Case

कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड व शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावच्या जमिनीवरून वाद झाला होता. जमिनीचा वाद थेट उल्हासनगर मधील हिललाईन पोलीस ठाण्यात पोहोचला होता. यावेळी महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात गोळीबार केला होता. यामध्ये महेश गायकवाड यांच्या शरीरामधून डॉक्टरांनी सहा गोळ्या बाहेर काढल्या होत्या. महेश यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर २४ दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर महेश गायकवाड यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. कल्याण- डोंबिवली येथील त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने कार्यालयात पोहचले असून कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news