ठाणे: पुढारी वृत्तसेवा : कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यातच अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील फरार एकाला अटक करण्यात आली. विकी गणोत्रा असे त्याचे नाव असून त्याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. Ganpat Gaikwad firing Case
या गोळीबार प्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड, त्यांचा पुत्र वैभव गायकवाड याच्यासह सहा जणांवर भादवी कलम 307, 120 ब, 34, 143, 147, 148, 149 सह शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे, संदीप सरवणकर आदी तिघांना अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील तीन आरोपी फरार घोषित करण्यात आले होते. Ganpat Gaikwad firing Case
दरम्यान, वैभव गायकवाड, नागेश बडेकर आणि विकी गणोत्रा या तिघा फरार आरोपी पैकी विकी गणोत्रा यास ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. विकी गणोत्रा व्यावसायिक व भाजप पदाधिकारी आहेत. तर या गुन्ह्यात आमदार गणपत गायकवाड यांचा पुत्र वैभव गायकवाड व नागेश बडेकर हे दोघेही अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेही वाचा