बीड जिल्हा हादरला, मिरवट येथे विवाहितेवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक

बीड जिल्हा हादरला, मिरवट येथे विवाहितेवर सामूहिक बलात्कार; दोघांना अटक
Published on
Updated on

परळी वैजनाथ; पुढारी वृत्‍तसेवा : गेल्या चार दिवसांपूर्वीचं बीड जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. आज पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. परळी तालुक्यात असणाऱ्या मिरवट गावामध्ये शेतात काम करत असणाऱ्या 22 वर्षीय विवाहितेवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

परळी तालुक्यातील मिरवट येथे (22 वर्षीय) पीडित महिला ही शेतात आपल्या कुटुंबासोबत राहते. (बुधवार) पीडिता आपल्या शेतातील घरालगत काम करत असताना अंगद केशव भदाडे (वय 40, रा. मिरवट) व साजन तिडके, वय 30, रा. भोगलवाडी) या दोघांनी एकटी असल्याचा फायदा घेत, या विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. तसेच याबाबत कोणाला सांगितलं तर तुला व तुझ्या कुटुंबाला जीवे मारू अशी धमकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संशयीत आरोपींना परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली असल्याचे ग्रामीण पोलीस प्र. निरीक्षक मारोती मुंडे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वीच बीडच्या बेलूरा गावातील (24 वर्षीय) विवाहितेवर, चुलत पुतण्यासह गावातीलच चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता परळीच्या मिरवट गावात पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने बीड जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news