गणेश उत्सव २०२३ : लाडक्या गणरायांच्या आगमनाला आता फक्त 5 दिवस उरले आहेत. त्यासाठी घराघरात साफ-सफाई, रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली आहेत. गणपती बाप्पांसाठी वैशिष्ट्यपूर्ण देखावे करण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत आहे. गणेश मूर्तींनी बाजारपेठा सजल्या आहेत. लोकांनी आधीच गणेश मूर्ती आगाऊ पैसे देऊन बूक करून ठेवली आहे. तर गणपती सह गौरीचे आगमन करण्यासाठीचीही लगबग सुरू आहे. गौरी-गणपतींसाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक मखरे आणण्यात आली आहे. तर मंडळांनी गणेश मूर्ती मंडळात आणून ठेवल्या आहेत. यावर्षी गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला आहे. या दिवशी पहाटेपासून ते दुपारपर्यंत श्रीगणेशाची स्थापना करावी, असे पंचांगकर्त्यांनी सांगितले आहे. गणपतीची आरती ही गणेश चतुर्थीपासून उत्सव काळात तसेच नित्य पुजेतही म्हटली जाते.
गणपतीची आरती
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची ।
नुरवी पुरवी प्रेम, कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुमकुम केशरा ॥
हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥२॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥धृ॥
हेही वाचा :