Ganesh Chaturthi 2023 | संभ्रम नको! ‘या’ दिवशीच होणार गणरायाचं आगमन, जाणून घ्या पंचागकर्ते दाते काय सांगतात?

Ganesh Chaturthi 2023 | संभ्रम नको! ‘या’ दिवशीच होणार गणरायाचं आगमन, जाणून घ्या पंचागकर्ते दाते काय सांगतात?
Published on
Updated on

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा, काही पंचांगांची गणित पद्धती भिन्न असल्यामुळे वर्षभरातील काही सणवारांमध्ये एक दिवसाचा फरक येत असतो आणि अशा वेळेस सणाच्या काही दिवस आधी लोकांमध्ये सण-उत्सव याविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून केले जाते. त्याकडे दुर्लक्ष करत यंदा मंगळवारीच म्हणजे १९ सप्टेंबर रोजीच श्री गणेश चतुर्थी असून त्याचदिवशी श्री गणेशाची स्थापना करावी, असे आवाहन पंचागकर्ते मोहन दाते यांनी केले आहे. (Ganesh Chaturthi 2023)

पंचांगकर्ते दाते पुढे म्हणाले, सोमवारी (दि. १८) तृतीया समाप्ती दुपारी बारा वाजून चाळीस मिनिटांनी होत असून दुसर्‍याच दिवशी चतुर्थी समाप्ती ही दुपारी पावणेदोनच्या सुमारास आहे. म्हणजे धर्मसिंधूतील वचनाप्रमाणे मंगळवारी चतुर्थी आहे. त्यामुळे या दिवशीच श्री गणेश चतुर्थी करणे योग्य होईल. काही पंचांगाच्या गणित पद्धतीत बदल असल्यामुळे काही सणांच्या बाबतीत एखाद् दुसर्‍या सणाबाबत फरक पडू शकतो. अशावेळी काहीजण मुद्दाम संभ्रम निर्माण केला जात आहे.

श्रृंगेरीच्या पू. शंकराचार्यांनी प्रत्यक्ष भेटीत आणि पू. गणेश्वर द्रविडशास्त्री यांनी डोंबिवली येथील सभेत मत मांडताना पंचांग विषयक मतमतांतरे राहणार आहेत, म्हणून आपण जे पंचांग नेहमी वापरत आहात त्याप्रमाणे आचरण करावे असे सांगितलेले आहे. तेच सूत्र धरून पंचांगकर्ते दाते म्हणाले, अचूक गणित आणि धर्मशास्त्रीय निर्णय असलेल्या दाते पंचांगाप्रमाणे कालनिर्णय, महालक्ष्मी कॅ लेंडर, तसेच इतर अनेक कॅ लेंडर्स, भारत सरकारचे राष्ट्रीय पंचांग, श्रीस्वामी समर्थ पंचांग, निर्णय सागर, राजंदेकर पंचांग आदी पंचांगांमध्ये दिल्याप्रमाणे मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी अंगारक योगावर गणपती स्थापना करणे योग्य होईल. (Ganesh Chaturthi 2023)

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आदी प्रदेशात सर्वत्र १९ सप्टेंबर रोजी म्हणजे मंगळवारी श्री गणेश चतुर्थी आहे.
– मोहन दाते, दाते पंचांगकर्ते

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news