गडचिरोली : दीड लाखाचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक

नक्षल समर्थकास अटक
नक्षल समर्थकास अटक

गडचिरोली : पुढारी वृत्‍तसेवा खून आणि जाळपोळ अशा हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या नक्षल समर्थकास गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. पेका मादी पुंगाटी (वय ४९), असे अटक करण्यात आलेल्या नक्षल्याचे नाव असून, तो भामरागड तालुक्यातील मिळगुडवंचा येथील रहिवासी आहे.

२१ मार्चला पोलिसांच्या जलद प्रतिसाद पथक आणि केंद्रीय राखीव दलाचे जवान भामरागड तालुक्यातील जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना त्याला अटक करण्यात आली.

१९ डिसेंबर २०२३ रोजी हिदूर गावाजवळ रस्ता बांधकामावरील ३ ट्रॅक्टर आणि एका जेसीबीची जाळपोळ करण्यात पेका पुंगाटीचा सहभाग होता. २०१६ मध्ये एका पोलिस अंमलदाराचे अपहरण करून त्याचा खून केल्याचा आरोपही पेकावर होता. दोन्ही प्रकरणी पेका पुंगाटीवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

नक्षल्यांना रेशन पुरवणे, त्यांची पत्रके टाकणे, नक्षल्यांच्या बैठकीसाठी गावकऱ्यांना बोलावणे इत्यादी कामे तो करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, कुमार चिंता, एम. रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news