G-20 चे अध्यक्षपद भारतासाठी मोठी संधी : पंतप्रधान मोदी

G-20 चे अध्यक्षपद भारतासाठी मोठी संधी : पंतप्रधान मोदी
Published on
Updated on

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा :  'मन की बात' हा कार्यक्रम शताब्दीकडे वेगाने वाटचाल करत आहे. हा कार्यक्रम माझ्यासाठी १३० कोटी देशवासीयांशी जोडण्याचे आणखी एक माध्यम आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागाच्या आधी खेड्यापाड्यातून आणि शहरांमधून आलेली पत्रे वाचणे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतचे ऑडिओ संदेश ऐकणे, हा माझ्यासाठी एक आध्यात्मिक अनुभव आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'  या कार्यक्रमातून संबोधित करताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जी-20 जगाच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश, जागतिक व्यापाराच्या तीन चतुर्थांश आणि जागतिक जीडीपीमध्ये ८५ टक्के आहे. तुम्ही कल्पना करू शकता की भारत आतापासून तीन दिवसांनी म्हणजे १ डिसेंबरपासून एवढ्या मोठ्या गटाचे, इतक्या शक्तिशाली गटाचे अध्यक्षपद भूषवणार आहे. G-20 चे अध्यक्षपद ही आमच्यासाठी मोठी संधी आहे. या संधीचा पुरेपूर वापर करून आपल्याला जागतिक कल्याणावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

शांतता असो वा एकता, पर्यावरणापासून संवेदनशीलतेपर्यंत किंवा शाश्वत विकासापर्यंत, भारताकडे या आव्हानांवर उपाय आहेत. 'वसुधैव कुटुंबकम' आमची वचनबद्धता आम्ही एक जग, एक कुटुंब आणि एक भविष्य या थीममध्ये प्रतिबिंबित होते. ते म्हणाले, येत्या काही दिवसांत देशाच्या विविध भागात G-20 शी संबंधित अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील. यादरम्यान, जगातील विविध भागांतील लोकांना तुमच्या राज्यांना भेट देण्याची संधी मिळेल. मला खात्री आहे की, तुम्ही तुमच्या स्थानिक संस्कृतीचे वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण रंग जगासमोर आणाल,असे ते म्हणाले.

G-20 : विक्रम-एस रॉकेटचे ऐतिहासिक उड्डाण

स्वदेशी स्पेस स्टार्ट-अपच्या विक्रम-एस रॉकेटने ऐतिहासिक उड्डाण करताच प्रत्येक भारतीयांची मान अभिमानाने उंचावली, असे पंतप्रधान म्हणाले. हे भारतातील खासगी अवकाश क्षेत्रासाठी एका युगाची पहाट दर्शवते. देशात आत्मविश्वासाने भरलेल्या नव्या युगाची ही सुरुवात आहे. तुम्ही कल्पना करू शकता, जी मुले एकेकाळी कागदी विमाने हाताने उडवत असत, त्यांना आता भारतातच विमान बनवण्याची संधी मिळत आहे.

कला, संगीत, साहित्यातून मानवतेची ओळख अधोरेखित

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, कला, संगीत आणि साहित्याशी असलेली आपली ओढ ही मानवतेची खरी ओळख आहे. आम्ही भारतीय प्रत्येक गोष्टीत संगीत शोधतो. नदीची कुरकुर असो, पावसाचे थेंब असो, पक्ष्यांचा किलबिलाट असो किंवा वाऱ्याचा गुंजणारा आवाज असो, संगीत आपल्या सभ्यतेत रुजलेले आहे. संगीत आपल्या संस्कृतीत सर्वत्र रुजलेले आहे. संगीत आपल्या समाजालाही जोडते. आपल्या संगीताच्या शैलींनी केवळ आपली संस्कृतीच समृद्ध केली नाही. तर जगभरातील संगीतावर अमिट छाप सोडली आहे. भारतीय संगीताची कीर्ती जगाच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news