Mount Kailash : आता भारतातून करता येणार ‘कैलास’ दर्शन!

Mount Kailash : आता भारतातून करता येणार ‘कैलास’ दर्शन!

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Mount Kailash : भगवान महादेवाचे (Lord Shankar) निवासस्थान अशी श्रद्धा असलेल्या पवित्र कैलास पर्वताचे (Kailas Parvat) दर्शन आता भारताच्या हद्दीतूनच घेणे शक्य होणार आहे. त्यासाठी आता चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये जाण्याची गरज नाही. येत्या सप्टेंबर महिन्यापासून याचा भक्तांना लाभ घेता येणार आहे.

उत्तराखंड राज्यातून हे कैलास पर्वताचे दर्शन घेणे आता शक्य होणार आहे. उत्तराखंड राज्यात पिथौरगढ जिल्ह्यात 18 हडार फूट उंचीवर असलेल्या लिपुलेख डोंगरावरुन कैलास पर्वत अगदी स्पष्ट दिसतो. या ठिकाणाहून कैलास पर्वताचे हवाई अंतर हे केवळ 50 किमी आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने पिथौरागढ जिल्ह्यातील नाभीढांग येथील KMVN हट्सपासून भारत-चीन सीमेवरील लिपुलेख खिंडीपर्यंत रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले आहे, जे सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. बीआरओच्या डायमंड प्रोजेक्टचे मुख्य अभियंता विमल गोस्वामी म्हणाले, "आम्ही नाभीढांगमधील केएमव्हीएन हट्सपासून लिपुलेख खिंडीपर्यंतचा सुमारे साडेसहा किलोमीटरचा रस्ता कापण्याचे काम सुरू केले आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला 'कैलास व्ह्यू पॉइंट' तयार होईल.

रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यालगत 'कैलास व्ह्यू पॉइंट' तयार होणार आहे. भारत सरकारने कैलास व्ह्यू पॉइंट विकसित करण्याची जबाबदारी हिरक प्रकल्पावर सोपवली आहे.गोस्वामी म्हणाले की, रोड कटिंगचे बरेच काम झाले असून हवामान अनुकूल असल्यास सप्टेंबरपर्यंत ते पूर्ण केले जाईल. रस्ता कापल्यानंतर कैलास व्ह्यू पॉइंट बनवण्याचे काम करण्यात येणार आहे. कोविडमुळे पुढे ढकलण्यात आलेली लिपुलेख खिंडीतून होणारी कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू झालेली नाही, त्यादृष्टीने असा पर्याय तयार केला जात आहे, जेणेकरून भाविकांना भारतीय हद्दीतूनच कैलास पर्वताचे दर्शन घेता येईल, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news