French Open : मासिक पाळीमुळे पराभव, महिला टेनिसपटू म्हणाली, ‘‘मी पुरुष असते…’’

French Open : मासिक पाळीमुळे पराभव, महिला टेनिसपटू म्हणाली, ‘‘मी पुरुष असते…’’
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाळीचे ते चार दिवस अनेक स्त्रियांसाठी खूप त्रासदायक असतात. ओटीपोटात होणाऱ्या तिव्र वेदना, पोटऱ्यांमध्ये येणारे गोळे, कंबरदुखी, मळमळ, डोकेदुखी, उलट्या, अपचन असे वेगवेगळे त्रास या काळात महिलांना सहन करावे लागतात. याच त्रासावर आता एका आंतरराष्ट्रीय महिला टेनिसपटूने मोठी प्रतिक्रिया देत निसर्गाने आम्हा स्त्रियांनाच हा त्रास का दिलाय असा गंभीर सवाल उपस्थित केला आहे. याला कारण म्हणजे तिचा फ्रेंच ओपन (French Open) स्पर्धेतील पराभव. या टेनिसपटूचे नाव आहे झेंग किनवेन. ती चीनची असून १९ वर्षांची आहे. चला झेंग किनवेन हिने तिच्या पराभवाला 'मासिक पाळी' जबाबदार असल्याचे का म्हटले असेल याबाबत जाणून घेऊया…

झेंग किनवेन पहिल्यांदाच फ्रेंच ओपन (French Open) स्पर्धेत खेळत होती. शानदार कामगिरी करत ती स्पर्धेच्या चौथ्या फेरीपर्यंत पोहचली. आता तिचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असणा-या इगा स्वितेक हिच्याशी होता. सामना सुरू झाला. अव्वल मानांकित स्वेतेकविरुद्ध झेगने चमकदार सुरुवात केली. तिने पहिला सेट 6-7 ने जिंकत मैदानात उपस्थित असणा-या प्रेक्षकांसह आपल्या प्रतिस्पर्धीला धक्का दिला. पण त्यानंतर तिने सलग दोन सेट गमावले. स्वितेकने पिछाडीवरून आघाडी घेत 6-0 आणि 6-2 असे दोन सेट जिंकत सामना खिशात टाकला. झेंग किनवेनला मात्र हा पराभव जिव्हारी लागला. या सामन्यादरम्यान झेंगला पायाची दुखापत झाली आणि उपचारासाठी ब्रेक घ्यावा लागला होता. परंतु तिच्या पराभवाचे खरे कारण काहीतरी वेगळंच होते.

सामन्यानंतर झेंग म्हणाली, 'माझ्या पायाच्या दुखापतीबद्दल कोणतीही चिंता नव्हती, परंतु ओटीपोटात तिव्र वेदना होत असल्याने माझा खेळ प्रभावित झाला आणि मला पराभवाचा सामना करावा लागला. जर मी मुलगा असते तर मला मासिक पाळीचा सामना करावा लागला नसता, अशी भावाना तिने व्यक्त केली.

सामन्यानंतर, झेंगने मासिक पाळीमुळे होणा-या वेदनांकडे लक्ष वेधले आणि म्हणाली, 'पाळीचा पहिला दिवस खूपच त्रासदायक असतो आणि अशा परिथितीत मला जागतिक क्रमवारीत पहिल्यास्थानी असणा-या खेळाडू विरुद्ध सामना खेळावा लागला. पाळीच्या पहिल्या दिवशी मला प्रचंड वेदना होतात. मी पहिला सेट जिंकला, पण पाळीमुळे निर्माण होणा-या वेदनांनी मला पराभूत केले. मी सलग दोन सेट गमावले आणि इतिहास रचण्याचा माझा स्वप्नभंग झाला. निसर्गाच्या विरोधात जाऊन मी अशक्य ते शक्य करण्यात असमर्थ ठरले. त्यामुळे मला वाटते की जर मी मुलगा असेते तर मला मासिक पाळीदरम्यानच्या त्रासाला सामोरे जावे लागले नसते. कोर्टवर मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला पण पाळीच्या वेदना सहन झाल्या नाहीत आणि माझा खेळ खराब झाला. ज्यामुळे मी पराभूत झाले.'

झेंगने 82 मिनिटांनंतर पहिला सेट जिंकला.. (French Open)

या सामन्याचा पहिला सेट 82 मिनिटांपर्यंत चालला, ज्यामध्ये झेंगने पाच वेळा सेट पॉईंट वाचविला. त्यानंतर तिने टायब्रेकरमध्ये 2/5 च्या पिछाडीनंतर जोरदार पुनरागमन केले आणि अव्वल मानांकीत इगा स्वितेकला 6-7 ने मात दिली. दुसर्‍या सेटमध्ये 0-3 अशी पिछाडीवर असताना झेंगचा पाय दुखावला. त्यामुळे तिने ब्रेक घेतला. यानंतर तिला सामन्यात पुनरागमन करता आले नाही आणि तिने सलग दोन सेट गमावले. ओटीपोटात दुखत असल्याने झेंगकडून 46 चूका झाल्या. झेंगने सुपर-16 मध्ये स्थान मिळवत 2018 ची चॅम्पियन सिमोना हालेपला मात दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news