पुढारी ऑनलाईन : तैवानची प्रमुख कंपनी फॉक्सकॉनने (Foxconn) वेदांताबरोबरचा करार मोडीत काढला आहे. दरम्यान एका मीडिया रिपोर्टनुसार, फॉक्सकॉनने सरकारला सांगितले आहे की भारतात त्यांची किमान चार ते पाच सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन युनिट्स उभारण्याची इच्छा आहे. फॉक्सकॉनने भारतीय वेदांता समुहासोबतच्या १९.५ अब्ज डॉलर सेमीकंडक्टर संयुक्त उपक्रमातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर ही नवीन माहिती पुढे आली आहे.
जगातील सर्वात मोठ्या कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रॉनिक्स निर्माता फॉक्सकॉनने गुजरातमध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले प्रॉडक्शन प्लँट्स उभारण्यासाठी गेल्या वर्षी वेदांतसोबत करार केला होता. पण आता हा करार संपुष्टात आला आहे. पण त्यांनी आता नव्या भागीदारांसोबत उत्पादन सुरु करण्याची तयारी केली आहे.
रिपोर्टनुसार, फॉक्सकॉनने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला तंत्रज्ञान भागीदारांसोबत केलेल्या किमान दोन सामंजस्य कराराच्या (एमओयू) तपशीलांची माहिती दिली आहे. "आम्ही त्यांना अंतिम करारांवर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे आणि प्रस्तावित तंत्रज्ञान, करारांचे स्वरूप, त्यात सहभागी लोक आणि इतर तपशीलांसह आमच्याकडे परत येण्यास सांगितले आहे," असे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याचा हवाल्याने दिले आहे. अधिकाऱ्याने पुढे म्हटले आहे की नवीन भागीदारीमध्ये टेक पार्टनर काही इक्विटी त्यांच्याकडे ठेवण्याची शक्यता आहे.
दरम्यान या घडामोडीविषयी दुसर्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, चार ते पाच पैकी किमान एक प्रोडक्शन प्रकल्प गुजरातमध्ये उभारला जाण्याची शक्यता आहे. Foxconn इतर ठिकाणांही प्रकल्प उभारण्याची शक्यतादेखील शोधू शकते. वेदांतासोबतचा करार संपुष्टात आल्यानंतरच्या एका दिवसानंतरच फॉक्सकॉनने म्हटले आहे की, भारताच्या सेमीकंडक्टर उत्पादन योजनेअंतर्गत सवलतीसाठी अर्ज करण्याचा त्यांचा विचार आहे.
हे ही वाचा :