पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून रुग्णालय परिसरात ड्रग्ज सापडल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये ड्रग्जचे जाळे राज्यभर विणले गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तर, ऑक्टोबरपर्यंत पुणे जिल्ह्यात तब्बल 14 कोटी 55 लाख रुपयांचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी समितीच्या पुणे शहर पोलिस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलिस आणि पुणे लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयाद्वारे कारवाई केली जाते.
संबंधित बातम्या :
ऑक्टोबरपर्यंत 409 प्रकारच्या कारवाईत 9 हजार 355 किलो 68 ग्रॅम वजनाचे 14 कोटी 55 लाख 34 हजार 223 रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, एकूण 504 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थांची होणारी बेकायदेशीर तस्करी, लागवड, विक्री, सेवन करणार्यांवर पोलिसाच्या मदतीने कारवाई करण्यात येते. वन विभाग तसेच कृषी परिसरात गांजाची लागवड होऊ नये, यासाठी वन विभाग, कृषी विभाग, महसूल विभागामार्फत कारवाई केली जाते.
अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या नागरिकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी जिल्हास्तरीय अमली पदार्थ सनियंत्रण केंद्र समिती काम करीत असून, अमली पदार्थांचे बेकायदेशीर तस्करी, विक्री, लागवडीबाबत माहिती मिळाल्यास नजीकच्या पोलिस ठाण्याला किंवा समिती सदस्य कार्यालयास माहिती द्यावी.
– डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी, पुणे