पिंपरी : आम्ही इथले भाई आहोत म्हणत वाहनांची तोडफोड करणार्‍या चौघांना अटक

डोंबिवली
डोंबिवली

पिंपरी : आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणून आठ जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. तसेच, दोघांना मारहाण करीत एकाच्या खिशातून पैसे काढून घेतले. ही घटना शनिवारी (दि. 23) रात्री सुंदरबाग कॉलनी, दापोडी येथे घडली. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. शेखर सुदाम भालेराव (वय 20), अंकीत सुदाम भालेराव (वय 21), सुमित भिम सुर्यवंशी (वय 19), रोनीत मोरे (वय 19) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह आदित्य कांबळे (वय 21), रोहित सरोदे (वय 20), अजय जाधव (वय 20), रोहित मनतोडे (21, सर्व रा. दापोडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संदीप विनायक बागुल (48, रा. दापोडी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दापोडीतील सुंदरबाग कॉलनीतील वाहनांच्या काचा फोडल्या. त्यावेळी फिर्यादी आणि त्यांचा भाऊ पराग त्यांना अडविण्यास गेले असता आरोपींनी दोघांना मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच, पराग यांच्या खिशातून जबरदस्तीने बाराशे रुपये काढून घेतले. त्यानंतर 'आम्ही इथले भाई आहोत. तुम्ही आमचे काय वाकडे करणार. तुम्ही जर पोलिसात तक्रार केली तर तुम्हाला सोडणार नाही', अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. भोसरी पोलिस तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news