मॅच फिक्‍सिंग प्रकरणी श्रीलंकेच्‍या माजी क्रिकेटपटूला अटक

श्रीलंकेच्‍या माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायके. ( संग्रहित   छायाचित्र )
श्रीलंकेच्‍या माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायके. ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मॅच फिक्‍सिंग प्रकरणी श्रीलंकेच्‍या माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायके आज ( दि. ६ सप्‍टेंबर) अटक करण्यात आली आहे. लंका प्रीमियर लीग (LPL) च्या २०२० मधील स्‍पर्धेत मॅच फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्‍याच्‍यावर आहे.

तीन आठवड्यांपूर्वी कोलंबोच्या चीफ मॅजिस्ट्रेट न्‍यायालयाने सचित्रा सेनानायके याला परदेशात जाण्यास बंदी घातली होती. तसेच अॅटर्नी जनरल विभागाला क्रीडा मंत्रालयाच्या विशेष तपास युनिटने त्‍याच्‍यावरील आरोप निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्‍याने आज सकाळी शरणागती पत्करली. त्‍याला क्रीडा भ्रष्टाचार अन्वेषण युनिटने अटक केली.

लंका प्रीमियर लीगमध्‍ये मॅच फिक्‍सिंग केल्‍याचा आराेप

सेनानायके यांच्यावर लंका प्रीमियर लीग (LPL) च्या 2020 आवृत्तीचे गेम फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. या स्‍पर्धेत त्‍याने दोन क्रिकेटपटूंना मॅच फिक्स करण्यासाठी प्रलोभन दाखवले होते. ३८ वर्षीय सचित्रा सेनानायके याने २०१२ ते २०१६ या काळात श्रीलंकेसाठी एक कसोटी, ४९ वन-डे आणि २४ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news