पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, तोशाखाना प्रकरणी तीन वर्षांची शिक्षा, एक लाखांचा दंड

इम्रान खान ( संग्रहित छायाचित्र)
इम्रान खान ( संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आज ( दि. ५) लाहोरमधील जमान पार्क घरातून अटक करण्यात आल्‍याचे वृत्त 'एएनआय' दिले आहे. त्‍यांना यांना कोट लखपत कारागृहात नेण्‍यात येणार आहे. तोशाखाना प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी इम्रान खान यांना  तीन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली हाेती. ( Imran Khan arrested )

तोशाखान प्रकरणी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्‍यावरील आरोप सिद्ध झाले आहेत.  त्‍यांनी जाणीवपूर्वक तोशाखाना भेटवस्तूंचे बनावट तपशील सादर केले. ते भ्रष्ट व्यवहारांसाठी दोषी ठरले आहे, असे स्‍पष्‍ट करत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (एडीएसजे) हुमायून दिलावर यांनी इम्रान खान यांना वर्षांच्या कारावास आणि एक लाख रुपयांचा दंडाची शिक्षा आज(दि.५) सुनावली होती.

 Imran Khan arrested : काय आहे प्रकरण?

२०१८ मध्‍ये पाकिस्‍तानमध्‍ये इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर आले. या काळात त्‍यांना अरब शासकांकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या. भेटवस्तूंमध्ये एक महागडी मनगटी घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता. त्या तोशाखान्यात (देशातील गोदाम) जमा करण्यात आल्या. नंतर त्यांनी सवलतीच्या दरामध्‍ये त्‍या वस्‍तू विकत घेतल्‍या आणि मोठ्या नफ्यात त्‍याची विक्री करण्‍यात आली, असा आरोप विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्‍यावर केला होता.

इम्रान खान यांनी तोशाखान्यातून २.१५ कोटी रुपयांना विकत घेतल्या आणि त्याच विक्री करुन ५.८ कोटी रुपयांचा नफा कमावला, असा आरोप त्‍यांच्‍यावर होता. या भेटवस्तूंमध्ये एक ग्राफ घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता.  या प्रकरणाच्‍या सुनावणीवेळी इम्रान यांनी सांगितले होते की, २१,५६ कोटी रुपये भरल्यानंतर राज्याच्या तिजोरीतून खरेदी केलेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून सुमारे ५८ लाख रुपये मिळाले होते. यामध्‍ये कोणताही गैरव्‍यवहार झाला नसल्‍याचा दावाही त्‍यांनी केला होता. या प्रकरणी २८ फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.

तोशाखाना प्रकरणी इम्रान ठरले होते अपात्र

निवडणूक आयोगाने तोशाखाना प्रकरणात खोटी विधाने केल्याबद्दल पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी संसदेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवले आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार, परदेशातील मान्यवरांकडून मिळालेली कोणतीही भेटवस्तू स्टेट डिपॉझिटरी किंवा तोशाखान्यात ठेवली पाहिजे. जर राज्याच्या प्रमुखाला भेटवस्तू ठेवायची असेल तर त्याला त्याच्या किंमतीइतकी रक्कम द्यावी लागेल. हे लिलाव प्रक्रियेद्वारे ठरवले जाते. या भेटवस्तू एकतर तोशाखान्यात ठेवल्या जातात किंवा त्याचा लिलाव केला जाऊ शकतो आणि त्यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय तिजोरीत जमा होतो.

पाच वर्ष निवडणूक लढवता येणार नाही

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तोशाखाना प्रकरणी आज ( दि. ५) तीन वर्षांच्या कारावास आणि एक लाख रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे आता इम्रान खान हे  पाच वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्‍याचा माेठा फटका त्‍यांच्‍या तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाला बसणार आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news