पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबई क्रूझ ड्रग्ज (mumbai drugs case) प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (aryan khan) याला दिलासा मिळाल्यानंतर एनसीबीचे तत्कालीन अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांनी एका टीव्ही वाहिनीला मुलाखत मोठे विधान केले. आर्यनला आज (दि. २७) क्लिनचिट मिळताच या प्रकरणी वानखेडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, 'सॉरी, मी या विषयावर काही बोलू शकत नाही. मी आता एनसीबीमध्ये कार्यरत नाही. या प्रकरणी कृपया एनसीबीच्या अधिकाऱ्यांना विचारा', असे म्हणत पतकारांच्या प्रश्नांना बगल दिली.
विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात आर्यन खानला (aryan khan) 28 दिवस तुरुंगात राहावे लागले होते. शुक्रवारी एनसीबीचे डीजी म्हणाले की, या प्रकरणात आर्यन खानसह सहा जणांविरुद्ध कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. सुरुवातीच्या प्रकरणात काही त्रुटी आढळल्या आणि पहिल्या तपास पथकाकडून चुका झाल्या. या प्रकरणी 14 जणांविरुद्ध ठोस पुरावे सापडले आहेत, असे ते म्हणाले. मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांनाही या प्रकरणात दिलासा मिळालेला नाही. (mumbai drugs case)
शुक्रवारी एनसीबीने एनडीपीएस कोर्टात सुमारे सहा हजार पानांचे आरोपपत्र सादर केले आणि त्यात आर्यन खानला (Aryan Khan) क्लीनचिट देण्यात आली. बॉलीवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान व्यतिरिक्त, गोपाल जी आनंद, समीर सैघन, भास्कर अरोरा आणि मानव सिंघल यांच्याविरुद्ध पुराव्याअभावी ड्रग्ज प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. आर्यनला ऑक्टोबर 2021 च्या सुरुवातीला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली होती. अनेक न्यायालयीन सुनावणीनंतर 28 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. (mumbai drugs case)