दत्ता दळवींना १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

दत्ता दळवींना १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दत्ता दळवी यांच्या अटकेनंतर भांडुपमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली होती. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दत्ता दळवींचा गुन्हा काय, अटक का केली?

दत्ता दळवींचा गुन्हा काय, अटक का केली? असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दळवी यांच्या अटकेनंतर खा. संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित करत हल्लाबोल केला. संजय राऊत यांनी भांडूप पोलिस स्थानकाबाहेरून माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news