पुढारी ऑनलाईन डेस्क : वाराणसी ज्ञानवापी मशीद प्रकरणातून माघार घेतलेल्या याचिकाकर्ते राखी सिंग यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची विनंती मान्य करण्याची मागणी केली आहे. अन्य चार याचिकाकर्त्यांकडून झालेल्या छळाचे कारण देत त्यांनी ही मागणी केली आहे. ज्ञानवापी मशीद संकुलात हिंदू प्रार्थना आणि विधी करण्याची परवानगी देण्याची मागणी करणाऱ्या या खटल्यातील पाच महिला याचिकाकर्त्यांपैकी राखी सिंग एक आहेत.
राखी सिंग यांनी आपला झालेल्या छळाची माहिती राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रातून दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, अन्य चार याचिकाकर्ते माझी व माझ्या संपूर्ण कुटुंबाची हिंदू समाजात बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मे २०२२ मध्ये त्यांनी निराधार आरोप करत माझ्याविरुद्ध अफवा पसरवली. यामुळे संपूर्ण हिंदू समाज माझ्या आणि माझ्या कुटुंबाला विरोध झाला. सरकार आणि प्रशासनातील बरेच लोकही या अपप्रचारात सामील आहेत. त्यामुळे माझ्यासह माझे संपूर्ण कुटुंब तणावाखाली आहेत.
या संपूर्ण प्रकारामुळे मी खूप दुखावले आहे. त्यामुळे, तुम्हाला विनंती आहे की मला इच्छामरणाची परवानगी द्या आणि या प्रचंड मानसिक वेदना आणि वेदनांपासून मुक्त होण्याचा मार्ग मोकळा करावा. मी ९ जून २०२३ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत तुमच्या उत्तराची वाट पाहीन. मला तुमच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, तर त्यानंतर जो निर्णय घेतला जाईल तो माझा स्वतःचा असेल, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.
राखी सिंग यांचे काका जितेंद्र सिंग विसेन, जे या खटल्यातील मुख्य हिंदू याचिकाकर्त्यांपैकी एक होते त्यांनी शनिवारी छळाचे कारण देत आपल्या कुटुंबाने या प्रकरणातून माघार घेतल्याची घोषणा केली होती.
हेही वाचा :