उद्धव ठाकरे पोहरादेवी तीर्थक्षेत्रांचा करणार दौरा

file photo
file photo

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : मानोरा तालुक्यातील बंजारा आणि इतर धर्म, समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील माता जगदंबा, संत सेवालाल महाराज आणि तपस्वी संत डॉ. रामराव बापू महाराज यांच्या देवालयांच्या दर्शनासाठी लवकरच शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट घेणार आहेत. ही माहिती शिवसेना पक्ष पदाधिकाऱ्यांनी नुकतीच धर्मपीठाधीश्वर बाबूसिंग महाराज यांच्यासोबत झालेल्या भेटीतून समोर आली आहे.

महाविकास आघाडीच्या पतनानंतर नुकत्याच शिंदे सेना गट-भाजप एकत्रित झाले. यानंतर भारतीय जनता पक्षाचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आणि दोन्ही जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघातील आपले निष्ठावान मतदार आणि पदाधिकारी राखण्यासाठी यापुढे विद्यमान आणि गतकालीन सरकार व पक्ष धुरीणांना मोठी कसरत करावी लागणार आहे. यामुळे प्रत्यय तीर्थक्षेत्र असलेल्या मानोरा तालुक्यातील पोहरादेवी आणि उमरी खुर्द येथील जागृत देवालये आणि तीर्थक्षेत्रामध्ये निवास करीत असलेल्या साधुसंत महंत यांच्या भेटीगाठी अधोरेखित होत आहे.

पोहरादेवी येथील बाबूसिंग महाराज यांच्या भेटीदरम्यान जुन्या वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविलेले शिवसेना नेते राजू नाईक, गोंदिया विधानसभा संपर्क प्रमुख इंदल भोला राठोड, विशाल जाधव, मानोरा तालुका अध्यक्ष रवींद्र पवार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्याम राठोड, विरू राठोड, वसंत राठोड उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news