नुपूर शर्मा यांना मिळाला शस्‍त्र परवाना, स्‍वसंरक्षणासाठी परवाना दिल्‍याची दिल्‍ली पोलिसांची स्‍पष्‍टोक्‍ती

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केल्याप्रकरणी वादाच्‍या भोवर्‍यात सापडलेल्‍या भाजपच्‍या माजी प्रवक्‍त्‍या नुपूर शर्मा यांना दिल्‍ली पोलिसांनी शस्‍त्र परवाना दिला आहे. वादग्रस्‍त विधानानंतर नुपूर शर्मा यांना अनेकवेळघ जीवे मारण्‍याच्‍या धमक्‍या मिळाल्‍या आहेत. त्‍यामुळे त्‍यांना स्‍वसंरक्षणासाठी हा परवाना दिला असल्‍याचे दिल्‍ली पोलिसांनी स्‍पष्‍ट केले ओ.

२६ मे २०२२ रोजी एका एका वृत्तवाहिनीवरील चर्चेवेळी नुपूर शर्मा यांनी वादग्रस्‍त विधान केले होते. याविरोधात देशभरात विविध ठिकाणी निदर्शने झाली. यानंतर त्‍यांना वारंवार जीवे मारण्‍याच्‍या धमक्‍या देण्‍यात आल्‍या होत्‍या. धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी अनेक राज्यांमध्ये नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. यानंतर भाजपनेही त्‍यांची प्रवक्‍ता पदावरुन हकालपट्‍टी केली. या वादावर पडदा टाकण्‍यासाठी भाजपने ही कारवाई केली होती.

नुपूर शर्मा यांनी स्‍वसंरक्षणासाठी बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार वैयक्तिक बंदूक बाळगण्याचा परवाना देण्यात आला आहे, असे दिल्‍ली पोलिसांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news