Tim Paine : कसोटी मालिका गमावताच ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूने घेतली निवृत्ती

Tim Paine : कसोटी मालिका गमावताच ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ खेळाडूने घेतली निवृत्ती
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. शुक्रवारी मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. मात्र त्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेन (Tim Paine) याने देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तो त्याच्या खेळापेक्षा वादांमुळे जास्त चर्चेत राहिला. ऑस्ट्रेलियन संघासाठी तो तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे.

क्वीन्सलँड विरुद्ध तस्मानियाचा शेफिल्ड शिल्ड प्रथम श्रेणी सामना संपल्यानंतर पेनने निवृत्ती जाहीर केली. त्याने अत्यंत कठीण काळात कांगारू संघाची कमान हाती घेतली होती. पण वादामुळे त्याला संघातून वगळण्यात आले. यष्टिरक्षक फलंदाज पेनने ऑस्ट्रेलियासाठी एकूण 35 कसोटी सामने खेळले, त्यापैकी 2018 ते 2021 या कालावधीत त्याने 23 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले.

2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेत बॉल टॅम्परिंग प्रकरणात अडकल्यानंतर स्टीव्ह स्मिथचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. त्या प्रकरणानंतर पेन ऑस्ट्रेलियाचा 46 वा कसोटी कर्णधार बनला. पण क्रिकेट तस्मानियाच्या माजी कर्मचाऱ्याला आक्षेपार्ह संदेश पाठवल्याचे उघड झाल्यानंतर पेनने 2021 मध्ये कसोटी कर्णधारपद सोडले.

टिम पेनची कारकीर्द

टीम पेनने (tim paine) ऑस्ट्रेलियासाठी 35 कसोटी, 35 एकदिवसीय आणि 12 टी-20 यासह 82 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या 82 सामन्यांमध्ये त्याने 2400 हून अधिक धावा केल्या आहेत. यात कसोटीमध्ये 1534, वनडेमध्ये 890 आणि टी-20 मध्ये 82 धावांचा समावेश आहे. पेनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एक शतक झळकावता आले. पेनने 2010 मध्ये लॉर्ड्सवर पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. कसोटी सामन्यांमध्ये त्याची सरासरी 32.63 इतकी राहिली. त्याची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 92 आहे. याशिवाय त्याने यष्टिरक्षक म्हणून 157 झेल आणि स्टंप आऊट केले.

18 वर्षे तस्मानियाचे प्रतिनिधित्व

होबार्टमध्ये जन्मलेल्या टिम पेनने (tim paine) 2005 मध्ये तस्मानियासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर तो या संघाकडून 18 वर्षे खेळला, परंतु क्वीन्सलँडविरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यानंतर त्याने निवृत्ती जाहीर केली. देशांतर्गत क्रिकेटच्या 154 सामन्यांमध्ये त्याने 6490 धावा केल्या असून त्याने तीन शतकेही झळकावली आहेत. त्याची सरासरी 26.63 इतकी आहे. सेक्सटिंगच्या वादात अडकल्याने त्याला ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद गमवावे लागले होते. त्याच्यानंतर पॅट कमिन्सला कर्णधार बनवण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news