मागणी नसलेली शेती औषधे, खते घेण्यासाठी हवेली तालुक्यात काही ठिकाणी सक्ती

मागणी नसलेली शेती औषधे, खते घेण्यासाठी हवेली तालुक्यात काही ठिकाणी सक्ती

लोणी काळभोर (पुणे ): पुढारी वृत्तसेवा हवेली तालुक्यात शेतकर्यांसाठी असलेल्या काही खत विक्री दुकानात विक्री होत नसलेली खते शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी काही डीलर व कृषी सेवा केंद्र सक्ती करत असल्याचे चित्र आहे. जास्त मागणी असलेल्या खतांसोबतच, विक्री होत नसलेली खते व औषधे  शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी डीलर व कृषी सेवा केंद्र चालक सक्ती करतात. खताचे पोते घ्यायची असतील तर एक हजार रुपयांची औषधेही घ्यावीच लागतील नाहीतर खत मिळणार नाही असे काही विक्रेते स्पष्टपणे सांगत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडवणुक केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे

शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणी ना कोणी लुटतच आलेले आहे, त्यामध्ये व्यापारी असो, औषध विक्रेते, बियाणे विक्रेते, विमा कंपन्या  इत्यादी यंत्रणेतील काही लोक गरीब शेतकऱ्यांना यांना त्या कारणाने फसवणूक करून लुटतच असल्याचे दिसते. शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा विमा मिळवण्यासाठी सुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, बियाणे विक्रेते कंपन्या बोगस बी बियाणे देऊन शेतकऱ्यांवर विभाग योजनेची आणि दुबार खर्चाची वेळ आणतात त्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होते त्यातच आता खत खरेदी करताना लुटणारे विक्रेत्यांची भर हवेली तालुक्यात पडत चाललेली आहे.

हवेली तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये असे प्रकार घडत असल्याचे शेतकरी बोलुन दाखवत आहेत तर तालुक्यातील बहुतांश भागात  नर्सरी व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे  तसेच बागायती पट्टा असल्याने बारमाही शेती केली जाते त्यामुळे  रासायनिक खत व औषध ची गरज ही भासतेच याचाच फायदा घेत औषध विक्री होत नसलेली खते शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी काही डीलर व कृषी सेवा केंद्र सक्ती करतात.

रासायनिक खत व औषध घेण्याची सक्ती करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवर थेट गुन्हे दाखल करण्याची तरतूद नवीन कायद्यात केली जाणार आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधानसभेत ही घोषणा केली. त्यामुळे जर हा कायदा लवकरात लवकर लागू झाला तर नको असलेली खते आणि जे काही वापरात नसलेली खते शेतकऱ्यांना जबरदस्तीने खत आणि औषध विक्रेते घ्यायला भाग पडतात अशांवर आता आळा बसू शकतो. आणि यातून शेतकऱ्यांची खूप मोठी लूट थांबू शकते.

रासायनिक खते व शेती पुरक औषधासाठी आम्ही शेतकर्यांची अनेक वर्षे सेवा करतो शेतकरी वर्ग जादा पाऊस खराब हवामान शेतीमालाला भाव नाही पिकांचे नुकसान आदी समस्याने त्रासला आहे दुकानदारांनी शेतकर्यांना हवी तेवढीच खते व औषधे द्यावी कोणत्याही प्रकारची सक्ती करु नये असे आवाहन श्रीनाथ शेती भंडार उद्योग समुहाचे संदीप धुमाळ यांनी केले आहे हवेली तालुक्यात बहुतांश ठीकाणी तक्रारी नाही परंतु काही अपवादात्मक दुकानात सक्ती केली जात असेल तर आम्ही सर्वजण विनंती करुन असे प्रकार थांबवू व शेतकर्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येईल असे धुमाळ यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news