नराशिवायच पिल्लांना जन्म देणार ‘ही’ माशी

नराशिवायच पिल्लांना जन्म देणार ‘ही’ माशी
Published on
Updated on

लंडन : ब्रिटनच्या केम्ब्रिज विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी एका खास प्रकारच्या माशीमध्ये यशस्वीरीत्या जेनेटिक इंजिनिअरिंग केल्याचा दावा केला आहे. ही माशी आता नराशिवायच प्रजोत्पादन करू शकेल. जगातील काही प्रजातींमधील माद्या नराच्या संपर्काशिवायच पिल्लांना जन्म देऊ शकतात. अर्थात ही पिल्ली म्हणजे माद्यांचे 'क्लोन' किंवा 'प्रतिरूप' असल्यासारखे असतात व ती नेहमी माद्याच असतात. आता 'ड्रोसोफिला मेलानोगास्टर' या फू्रट फ्लाय म्हणजेच फळ माशीमध्ये जनुकीय फेरबदल करून अशी क्षमता निर्माण करण्यात आली आहे.

सायन्स जर्नल 'करंट बायोलॉजी' मध्ये याबाबतच्या संशोधनाची माहिती देण्यात आली आहे. या जनुकीय सुधारित माश्यांची पिल्लीही म्हणजेच या नव्या माद्याही नराशिवायच प्रजोत्पादन करू शकतील. या प्रकाराला वैज्ञानिक भाषेत 'पार्थेनोजेनेसिस' असे म्हटले जाते. काही सरीसृप व पक्षी अशा प्रकारे पिल्लांना जन्म देऊ शकतात असे आढळून आलेले आहे. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीने म्हटले आहे की आता प्रथमच एखाद्या जीवामध्ये जनुकीय बदल घडवून आणून अशा प्रकारची क्षमता निर्माण करण्यात आलेली आहे.

या माश्या एरव्ही लैंगिक प्रजननच करीत असतात. मात्र, आता त्या अलैंगिक प्रजननही करू शकतील. सर्वसामान्यपणे या मााश्यांची अंडी नराच्या शुक्राणूने फलित होऊन भ्रूणाचा विकास होतो. मात्र, आता या माश्या स्वतःच आपल्या अंड्यांमध्ये भ्रूणाचा विकास घडवून आणू शकतील. गेल्याच महिन्यात कोस्टारिकामधील एका प्राणीसंग्रहालयात असलेल्या मादी मगरीने नराच्या संपर्काशिवाय पिल्लांना जन्म दिला होता. मासे व अजगर माद्यांबाबतही अशा घटना घडल्याचे यापूर्वी आढळले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news