Flu cases surge in China | चीनमध्ये कोरोना नंतर आता फ्लूचा उद्रेक, लॉकडाऊनची तयारी

Flu cases surge in China | चीनमध्ये कोरोना नंतर आता फ्लूचा उद्रेक, लॉकडाऊनची तयारी
Published on
Updated on

बिजिंग; पुढारी ऑनलाईन : चीनमध्ये कोरोना नंतर आता फ्लूची (Flu cases surge in China) साथ पसरली आहे. फ्लू रुग्णसंख्या वाढल्यामुळे चीनमधील फार्मसीमध्ये अँटीव्हायरल औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. फ्लूचा फैलाव वेगाने होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून चीनच्या शिआन (Xi'an) शहरातील अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनची तयारी केली आहे. फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गरज पडल्यास शहर लॉकडाऊन करु, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आपत्कालीन प्रतिसाद प्लॅननुसार, जर फ्लूचा उद्रेक होऊन गंभीर धोका निर्माण झाल्यास शिआन शहर लॉकडाऊन केले जाईल आणि शाळा बंद ठेवल्या जातील. अनेक इंटरनेट यूजर्संनी प्रशासनाच्या या खबरदारीच्या उपायांना अततायीपणा असे म्हटले आहे. याआधी चीनच्या कोविड निर्बंधांना लोकांनी जोरदार विरोध केला होता. (Flu cases surge in China)

चीनमध्ये कोरोनाची लाट ओसरत असतानाच संपूर्ण चीनमध्ये फ्लूची प्रकरणे वाढली आहेत. फ्लू रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे देशभरातील फार्मसीमध्ये अँटीव्हायरल औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिआन शहराने साथीच्या रोगाच्या काळात देशातील कडक लॉकडाऊनचा अनुभव घेतला होता. डिसेंबर २०२१ मध्ये एका महिन्यासाठी स्थानिकांना त्यांच्या घरातून बाहेर पडण्यास बंदी घातली होती. यामुळे येथील लोकांना अन्न आणि जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडता आले नव्हते.

दरम्यान, चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच जगभर कोरोना महामारीचा फैलाव झाला, अशी पुष्टी अमेरिकेची तपास यंत्रणा 'फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन्स'चे (एफबीआय) संचालक ख्रिस्तोफर व्रे यांनी नुकतीच केली होती. कोविड -१९ (COVID-19) महामारी चीन सरकारच्या प्रयोगशाळेमुळेच उद्भवली, असेही त्यांनी म्हटले आहे. "एफबीआयने असे मूल्यांकन केले आहे की कोरोना साथीच्या रोगाची उत्पत्ती प्रयोगशाळेतूनच झाली असण्याची अधिक शक्यता आहे," असे ख्रिस्तोफर व्रे यांनी म्हटले होते. कोरोना विषाणूची उत्पत्ती कशी झाली याबाबत एफबीआयने केलेली ही पहिली सार्वजनिक पुष्टी आहे.

तर, चीनने वुहानमधील प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा फैलाव झाल्याच्या दावा फेटाळून लावला आहे आणि हा आरोप मानहानीकारक असल्याचे चीनने म्हटले होते.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news