देशातील गो फर्स्ट एअरलाईनची विमान सेवा 9 तारखेपर्यंत बंद; प्रवाशांना मोठा फटका

देशातील गो फर्स्ट एअरलाईनची विमान सेवा 9 तारखेपर्यंत बंद; प्रवाशांना मोठा फटका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गो फर्स्ट एअरलाईनने तांत्रिक कारणामुळे देशातील विमान सेवा मंगळवारपर्यंत (दि. 9) बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे. पुण्यातून दररोज गो फर्स्टची सात ते आठ विमाने सुटत असतात. ती आता बंद झाल्यामुळे विमान प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. पुणे विमानतळावरून दररोज 80 ते 90 दरम्यान विमाने सुटतात. त्यापैकी गो फर्स्टची सात ते आठ विमाने आहेत.

ही विमाने प्रामुख्याने नागपूर, चेन्नई, दिल्ली या तीन शहरांसाठी पुण्यातून सेवा देतात. त्यापैकी सर्वाधिक विमाने ही दिल्लीसाठी असतात. आता नागरिकांनी बुकिंगदेखील केले आहे. मात्र, अचानक गो फर्स्टने त्यांची सेवा 9 मे पर्यंत बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, त्याचा फटका गुरुवारी (दि. 4) पुणे विमानतळावर विमान प्रवाशांना बसला. कंपनीने विमाने स्थगित केल्याच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएने कंपनीला नोटीस काढली आहे. स्थगित केलेल्या विमानांतून प्रवास करणार्‍यांची पर्यायी व्यवस्था करावी. त्यांना किमान त्रास होईल हे पाहावे, असे डीजीसीएने या पत्रात नमूद केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news